Saturday, April 27, 2024
Homeजळगावआचार्य महोत्सव 2021 चे शेंदूर्णीत भव्य उद्घाटन

आचार्य महोत्सव 2021 चे शेंदूर्णीत भव्य उद्घाटन

शेंदूर्णी, Shendurni ता. जामनेर

खानदेश चे कर्मवीर कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड (Acharya Bapusaheb Gajananrao Garud) यांच्या पुण्यस्मरण (Remembrance) निमित्ताने धी शेंदूर्णी सेकंडरी एज्यु.को-ऑप सोसायटी लि. शेंदूर्णी अंतर्गत येणाऱ्या कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड प्रतिष्टान तर्फे आयोजित, 15 शाळांचा आचार्य महोत्सवाचे (Acharya Mahotsav) आज थाटात उद्घाटन (Inauguration) संपन्न झाले

- Advertisement -

या निमित्ताने प्रतिष्टान च्या वतीने भरगच्च अश्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले,या सात दिवसीय आचार्य महोत्सव 2021 ची सुरुवात विद्यार्थी पथसंचालनने झाली, सकाळी नऊ वाजता आचार्य ग.र. गरुड़ माध्य . वि. व क.महाविद्यालय , शेंदुर्णी,

श्रीमती के. डी. नाईक माध्य. विद्यालय, पाळधी, अण्णासो. भा. खं . गरुड माध्य. विद्यालय, वाकडी, श्रीमती पी . डी . बडोला माध्य . विद्यालय , वरखेडी ता . पाचोरा, डॉ.जे. जी . पंडीत माध्य . विद्यालय , लोहारा ता . पाचोरा, अप्पासो . पी. एस. पाटील माध्य. विद्यालय , नांद्रा ( माहिजी ) ता. पाचोरा, न्यू इंग्लिश स्कूल , बेटावद ता . जामनेर, श्री भा . बा . ओ . पाटील माध्य . विद्यालय , तारखेडा ता . पाचोरा, प्रताप माध्य . विद्यालय , वडगाव बु ता . भडगाव, श्रीमती ए . के . पाटील माध्य . विद्यालय , मंगरुळ ता . चोपडा, राणीदानजी जैन मा.वि. व सौ . कां . जैन क . महा . वाकोद ता . जामनेर, विकास माध्य . विद्यालय , गणपूर ता . चोपड़ा, नि.पं. पाटील माध्य . विद्यालय , पळासखेडा ता . जामनेर, श्रीमती रत्नाबार्ड सु . जैन माध्य . वि . तोंडापुर ता . जामनेर, डॉ . नि.सु. ( जैन ) ब्रम्हेचा मा.वि. विटनेर ता . जळगाव, अ.र.भा. गरुड कला , वाणिज्य व विज्ञान महा शेंदुर्णी ता . जामनेर, आचार्य गजाननरावं गरुड प्राथ . विद्यामंदीर शेंदुणी ता . जामनेर, पुज्य भगिरथीबाई गरुड बालविद्यामंदीर , शेंदुर्णी ता . जामनेर या शाळेतून विविध रंगी क्रीडा पोशाखात आलेले सर्व विद्यार्थी नगर पंचायत मैदान शेंदूर्णी येथून पथसंचालन सुरुवात करून शेंदूर्णी नगरातील वाडीदरवाजा, गांधी चौक , या मार्गाने मार्गक्रमण करून प्राथमिक आरोग्य केंद्र येथे समारोप झाला,

मैदानी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दुपारी 1 वाजता अप्पासाहेब र भा गरुड महाविद्यालयाच्या भव्य क्रीडा संकुलावर झाले, या प्रसंगी सर्व प्रथम संस्था, प्रतिष्टान व महाविद्यालयाच्या ध्वजाचे ध्वजारोहण झाले,त्यानंतर सर्व शाळेतील खेळाडू यांनी ध्वज व मान्यवरांसमोर संचालन व मानवंदना दिली, त्यानंतर दीपक रमेश भोई या खेळाडूने मशाल घेऊन मैदान परिक्रमा केली , त्यानंतर कार्यक्रम उद्घाटक मिलिंद दीक्षित जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव, कार्यक्रम अध्यक्ष उज्वलाताई काशिद संचालिका, संजयजी गरुड अध्यक्ष ,धी शेंदूर्णी सेक. एज्यु.कोऑफ सो.सा., सतिष चंद्र काशिद सचिव धी शेंदूर्णी सेक. एज्यु.कोऑफ सो.सा., देवश्री काशिद संचालिका, अभिजितजी काशिद संचालक , उत्तमदादा थोरात,सहसचिव दिपकभाऊ गरुड, सगरकाका संचालक, यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून झाले,

कार्यक्रमाचे उद्घाटक मिलिंद दीक्षित यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अश्या प्रकारे स्पर्धा आयोजित केल्याने एक नवी ऊर्जा मिळते व ग्रामीण भागातच खरा खेळाडू तयार होऊ शकतो असा विश्वास दाखवला व आयोजकांचे स्पर्धा आयोजन बद्दल अभिनंदन करून सर्व खेळाडू ना शुभेच्छा दिल्या, तसचे संजयजी गरुड यांनी देखील मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या,

सतिष चंद्र काशिद यांनी स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती निर्माण व्हावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात यश संपादन करावे अशी भावना व्यक्त केली,

या प्रसंगी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये मिले सूर मेरा तुम्हार, ललाटी भंडार या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले,

या प्रसंगी जे. सी. पाटील, दिपक बोरसे,गिरीष दादा, प्रसन्न फासे ,पंडितदादा जोहरे,धीरज जैन, एस के राठी, सतिष बारी नगरसेवक, गजानन धनगर नगरसेवक, डॉ विजयानंद कुलकर्णी, विलास नेरकर, सुनील पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी जिल्हा सेल, डॉ मोहित जोहरे वैद्यकीय अधिकारी,प्राचार्य डॉ व्ही आर पाटील, संजय उदार, कैलास देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते,

या कार्यक्रमाचे प्रस्थाविक डॉ महेश पाटील यांनी केले,तर सूत्रसंचालन डॉ दिनेश पाटील, डॉ योगिता चौधरी यांनी केले,तर कैलास देशमुख यांनी आभार व्यक्त केले, या सर्व कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी हजर होते , सर्व क्रीडाशिक्षक ,शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

प्रथम दिन स्पर्धा निकाल

1 तीन हजार मीटर धावणे

प्रथम: दीपक रमेश भोई शेंदूर्णी

द्वितीय:आकाश माणिक थाटे वरखेडी

तृतीय: विवेक महारु गावंडे पळसखेडे

2 4 X100 रिले 17 वर्षे वयोगट मुले

प्रथम आ.र.भा गरुड कला,वाणिज्य महाविद्यालय शेंदूर्णी

द्वितीय: राणीदानजी जैन विद्यालय वाकोद,

तृतीय: आ.ग.र.गरुड मा.विद्यालय शेंदूर्णी

- Advertisment -

ताज्या बातम्या