Thursday, April 25, 2024
Homeनगर3 दशकांनंतर मिळाला ‘सर्वोच्च’ न्याय

3 दशकांनंतर मिळाला ‘सर्वोच्च’ न्याय

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे झगडे फाट्यावर 1992 मध्ये दोन गटांत वाद झाले होते. यात आरोपींनी साहेबराव अर्जुन होन यांना बेदम मारहाण करुन जखमी केले होते. होन यांनी कोपरगाव, औरंगाबाद व सुप्रीम कोर्टात आरोपींच्या विरोधात क्रिमिनल केस दाखल केली होती. तब्बल तीन दशकांनंतर सुप्रीम कोर्टाने होन यांना न्याय देत आरोपी रावसाहेब काशिनाथ होन, भाऊसाहेब गोपाळ होन, भास्कर मच्छिंद्र माकोने यांना सहा महिने सश्रम कारावास व प्रत्येकी 40 हजार रुपये दंड ठोठावला.

- Advertisement -

चांदेकसारे येथे झगडे फाट्यावर 26 मार्च 1992 रोजी सकाळी ट्रॅक्टरला हवा भरण्यासाठी साहेबराव होन आले असता आरोपींनी होन याच्यांशी हुज्जत घातली. त्यानंतर संध्याकाळी दहा ते बारा जणांच्या टोळक्याने साहेबराव होन यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. कोपरगाव न्यायालयात वरील आरोपींविरुद्ध दहा वर्षे ही केस चालू होती. कोर्टाने आरोपींना शिक्षा सुनावली होती.

सदरची केस पुन्हा औरंगाबाद न्यायालयात चालली. औरंगाबाद खंडपिठाने आरोपींना 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर सदर शिक्षकेबाबत होन यांचे समाधान न झाल्याने त्यांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आरोपींविरुद्ध अपिल केले. सुप्रीम कोर्टात अ‍ॅड. शिवाजीराव जाधव, अ‍ॅड. मधुकर होन यांनी फिर्यादी साहेबराव होन यांच्या बाजूने युक्तिवाद केला. सर्व बाबींचा विचार करून सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती सूर्याकांत यांनी आरोपींना सहा महिने सश्रम कारावास व 40 हजार रुपयांचा प्रत्येकी दंड अशी शिक्षा सुनावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या