Saturday, April 27, 2024
Homeनगरदरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दरोड्याचा गुन्हा करून मागील तीन वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगरमध्ये अटक केली आहे.

- Advertisement -

प्रमोद बाळासाहेब कराळे (वय 34 रा. वसंत टेकडी, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अर्जुन काशिनाथ जाधव (रा. मल्हारवाडी ता. राहुरी) हे 19 फेब्रुवारी 2018 रोजी कांद्याने भरलेला ट्रक वांबोरी येथील मार्केटवर घेऊन जात असताना त्यांना शामराव भागवत गाडे (रा. घोरपडवाडी ता. राहुरी) व इतर तिघांनी अडविले. जाधव यांच्याकडील ट्रक चोरटे घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी जाधव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सदर गुन्ह्यात प्रमोद कराळे याचे नाव निष्पन्न झाले. आरोपी कराळे गुरूवारी नगरमधील वसंत टेकडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. निरीक्षक कटके यांनी पथकाला आरोपी कराळे याला अटक करण्याच्या सूचना केल्या. पथकाने आरोपी कराळे याला अटक केली. पोलीस हवालदार विश्वास बेरड, पोलीस नाईक सुरेश माळी, शंकर चौधरी, विशाल दळवी, पोलीस शिपाई सागर ससाणे, रोहित येमूल, मयूर गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या