Friday, May 10, 2024
Homeनगरपेट्रोल ओतून ठार मारले, दोघा आरोपींना जन्मठेप

पेट्रोल ओतून ठार मारले, दोघा आरोपींना जन्मठेप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलेवर पेट्रोल ओतून तिला जाळून ठार मारल्याप्रकरणी दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांकचे न्यायाधीश पी. आर. सित्रे यांनी आरोपींना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व 5 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी अभियोक्ता वैशाली राहुल राऊत यांनी काम पाहिले.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी अविनाश उर्फ आवडया सादीश काळे आणि सादीश जाकीट काळे दोघे रा. वाळुंज पारगांव (ता. पारनेर) यांनी फिर्यादी रितेश सुभाष भोसले यांची पत्नी करिश्मा हिच्या अंगावर बाटलीतून पेट्रोल टाकून तिला पेटवून देवून जिवे ठार मारले. ही घटना 2018 मध्ये घडली होती. रितेश भोसले व त्यांची पत्नी मयत करीश्मा निघोज (ता. पारनेर) येथे करीश्माचे वडीलांना भेटण्यासाठी लहान मुलांसह गेले होते. त्यांना भेटल्यानंतर रितेश भोसले हे लहान मुलांना घेवून गावी राळेगण थेरपाळ येथे आले. रितेशची पत्नी तिच्या आई वडिलांचे घरी मुक्कामी थांबली.

18 ऑक्टोबरला 2018 ला रात्री 1 वाजणेच्या सुमारास त्यांचा मेहुणे प्रविण काळे याने फिर्यादी यांना फोन केला की, आरोपी साजिश काळे व आरोपी अविनाश काळे यांनी करिश्मा हिला काही एक कारण नसताना शिवीगाळ केली. तसेच बाटलीतून पेट्रोल अंगावर टाकून तिला पेटवून दिले व पुरावा नष्ट केला. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक आर.डी. पवार व विजयकुमार बोथरे यांनी केला. खटल्यादरम्यान सरकार पक्षाच्यावतीने 11 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. न्यायालयासमोर आलेला साक्षीपुरावा व सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राहय धरूनन्यायालयाने आरोपी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, त्यांना पैरवी अधिकारी सहायक फौजदार एकनाथ जाधव, हवालदार शिवनाथ बडे, कुरेशी, वाघमारे यांनी सहाय्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या