20 लाखांच्या चोरीप्रकरणी आरोपीस बोदवडमध्ये अटक

jalgaon-digital
2 Min Read

स्वामी पॉलीटेक कंपनीत साडेबारा लाखांची धाडसी चोरी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील व्ही सेक्टरमधील स्वामी पॉलीटेक या प्लॅस्टिक मोल्डेड फर्निचर बनविणार्‍या कंपनीतून चोरट्याने 20 लाखांची चोरी केली होती.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी बोदवड येथून आरोपीस अटक केली आहे. अरविंद अरूण वाघोदे (वय 22) रा. कोल्ही गोलाद, लिहा बुद्रुक ता. मोताळा जि.बुलढाणा ह.मु. कृष्णा नगर, सुप्रिम कॉलनी असे आरोपीचे नाव आहे.

एमआयडीसीतील व्ही.23 सेक्टर परिसरात स्वामी पॉलिटेक नावाची कंपनी असून दोन शिप्टमध्ये कंपनीत काम चालते.

या कंपनीचे पहिल्या मजल्यावर ऑफिस तर बाजूला भरत मंधान (रा. गोदडीवाला हौसिंग सोसायटी मोहाडी रोड ) यांचे मावसभाऊ वासुदेव उर्फ विक्की विजू पमनानी यांची कॅबीन आहे. या कॅबीनच्या कपाटात जमा झालेली रोकड 1 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता भरत मंधान व त्यांचा भाऊ वासुदेव यांनी तीन ते चार दिवसांपासून फेरीवाल्यांकडून जमा झालेली 20 लाखांची रोकड कपाटात ठेवली होती.

दुसर्‍या शिप्टमध्ये काम करणार्‍या कामगारांना सूचना देवून मंधान व त्यांचा भाऊ दोघेही घरी निघून गेले. दि.2 रोजी सकाळी 10 वाजता ऑफिसबॉय मिनास सैय्यद याचा फोन आला. त्याने ऑफिसमधील ड्रॉवरचे कुलूप तुटलेले असून सामान अस्तव्यस्त असल्याचे सांगितले.

मंधान यांनी कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता चोरटा कॅमेर्‍यात कैद झाला होता. याप्रकरणी भरत मंधान यांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल केला होता.

पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, पो.ना. मुदस्सर काझी, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. सतिष गर्जे या पथकाने संशयित आरोपी अरविंद अरुण वाघोदे (रा.ह.मु. कृष्णा नगर,सुप्रिम कॉलनी जळगाव) यास 4 रोजी बोदवड परिसरातील जंगलात मध्यरात्री 2.30 वाजता अटक केली.

त्याच्या ताब्यातील 12 लाख रुपये हस्तगत केले आहे. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपास सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ रतीलाल पवार करीत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *