Friday, April 26, 2024
Homeनंदुरबार11 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अटक

11 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अटक

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

दरोड्याच्या गुन्ह्यातील (crime of robbery) 11 वर्षांपासून पाहिजे असलेल्या आरोपीस (Accused) स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) निजामपूर येथून अटक (Arrested) केली आहे.

- Advertisement -

सन 2011 मध्ये नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमज गाव शिवारात फिर्यादी केरसन धेड्या नाईक (Kerson Dhedya Naik) याच्या शेतातील घरावर अज्ञात 10 ते 12 लोकांनी हल्ला करुन त्यांना मारहाण करुन दरोडा (Robbery) टाकुन कपाटातील 23 हजार रुपये रोख व 2 मोबाईल असा ऐवज जबरीने चोरुन नेला होता. त्यानुसार भादवि कलम 395 397 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास लावून 2 आरोपी अटक करुन गुन्हा (Crime) उघडकीस आणला होता.

सदर गुन्ह्यातील इतर निष्पन्न आरोपी (Accused) हे अटक झालेले नसल्याने गुन्हा घडल्यापासून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील पाहिजे, फरार व फेर अटक पाहिजे यादीमध्ये समाविष्ट होते. दि.14 मार्च 2022 रोजी सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी सरेशलाल उर्फ शेरीलाल पेरुलाल भोसले हा निजामपूर येथे येणार असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे (local crime branch) पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली. पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ निजामपुरला रवाना केले.

सदर आरोपी हा एका गॅरेजवर असल्याचे पथकास निदर्शनास आल्याने पथकाने गॅरेजचे बाहेर सापळा (Trap) लावला. या सापळ्यात तो अडकला. त्यास पथकाने ताब्यात घेऊन पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार सजन वाघ, प्रमोद सोनवणे, मुकेश तावडे, पोना विशाल नागरे यांच्या पथकाने केली. पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यात फरार व पाहिजे असलेला आरोपी पकडण्याच्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने 20 आरोपींना नंदुरबार जिल्ह्यातून तसेच शिरपुर, मालेगाव येथुन ताब्यात घेऊन गुन्ह्याचे तपासकामी संबंधीत पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या