Thursday, April 25, 2024
Homeधुळेमहासभेत आरोप-प्रत्यारोप, प्रशासन निरूत्तर

महासभेत आरोप-प्रत्यारोप, प्रशासन निरूत्तर

धुळे Dhule। प्रतिनिधी

महापालिकेची (Municipal Corporation) महासभा(General Assembly) आरोप-प्रत्यारोपांनी (Accusations and counter-accusations) गाजली. आरोप-प्रत्यारोपांमुळे (accusations) मात्र प्रशासन निरूत्तर (Administration response) झाले. माजी उपमहापौर भगवान गवळी (Former Deputy Mayor Bhagwan Gawli) यांनी महापौरांकडे बोलण्याची संधी मागितली. परंतु, तुम्ही नंतर बोला, अगोदर विरोधी पक्षनेत्यांना बोलू द्या, असे महापौर प्रदीप कर्पे (Mayor Pradeep Karpe) यांनी सांगितल्यामुळे भगवान गवळींनी सभागृहातून काढता (Leaving the hall) पाय घेतला.

- Advertisement -

महापौर प्रदीप कर्पे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा घेण्यात आली. यावेळी आयुक्त देविदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायक्त विजय सनेर, नगरसचिव मनोज वाघ, विरोधी पक्षनेते कमलेश देवरे, सभागृह नेते राजेश पवार, भगवान गवळी, शीतलकुमार नवले, सुनिल बैसाणे, नरेंद्र चौधरी, साबीर खान, अमोल मासुळे, नागसेन बोरसे, रंगनाथ ठाकरे, किरण कुलेवार, कशीश उदासी, सुरेखा उगले, सईदा अन्सारी, अमीन पटेल, संतोष खताळ, वैशाली वराडे, फातेमा अन्सारी, दगडू बागुल, वंदना भामरे आदी उपस्थित होते.

भगवान गवळी यांना महापौरांनी बोलण्याची संधी न दिल्याने ते सभागृह सोडून बाहेर जाण्यास निघाले. यावेळी सत्ताधारी नगरसेवकांनी त्यांना विनंती करुन बसविले. त्यानंतर काही वेळेतच त्यांनी सभात्याग केला. बाहेर पडल्यानंतर ते म्हणाले की, प्रभागात दहा-दहा दिवसांपासून पाणी नाही, त्यामुळे सभागृहात थांबून आम्हाला काय करायचेय? प्रशासन काय लक्ष घालतेय? पाणी नसल्याने नागरिक आम्हाला शिव्या घालत आहेत. महापालिकेचे प्रशासन निष्क्रीय आहे. सर्वाधिक टॅक्स देवपूर भागातून वसूल होतो. मात्र, पाण्यावाचून त्यांची दिवाळी कशी गेली? हे प्रशासनाला माहिती आहे का? असा संतप्त सवालही श्री.गवळी यांनी उपस्थित केला.

महापौर कर्पे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या परंतु, त्यांच्याकडे जनतेच्या समस्या जाणून घ्यायला वेळ नाही. पाण्यावाचून दिवाळीत जनतेचे प्रचंड हाल झाले, त्या समस्या आम्ही मांडायच्या नाहीत का? सभागृहात का बोलू दिले जात नाही? आम्ही नागरिकांच्या शिव्याच खायच्या का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सभेत सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही यंदाची दिवाळी आम्हा सर्वांना वाईट गेल्याचे सांगितले.

ऐन दिवाळीत नागरिकांना 10-15 दिवस पाणी मिळालेलेे नाही. त्यामुळे आम्हाला दिवाळीत नागरिकांकडून शुभेच्छा नव्हे तर तक्रारीच अधिक आल्याचे नगरसेवकांनी सभागृहात सांगितले. तसेच या सर्व अपयशाचे खापर नगरसेवकांनी प्रशासनावर फोडले. त्यामुळे महापौरांनी पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांना अल्टीमेटम देतांना सांगितले की, येत्या आठ दिवसात शहराला पुर्वीप्रमाणे तीन दिवसाआड पाणी पुरवठा झाला पाहिजे. या कामात हलगर्जी केल्यास दोषींवर कारवाई केली जाईल असा इशारा श्री. कर्पे यांनी दिला.

विरोधी पक्षनेते कमलेश देवरे यांनी पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या प्रश्न सभागृहात उपस्थित करून प्रशासनासह सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधून घेतले.

देवपूरवासीयांना यंदाची दिवाळी चांगली गेलेली नाही. देवपूरवासीयांना दहा ते पंधरा दिवस पाणी मिळालेले नाही. पाण्यावाचून त्यांचे प्रचंड हाल झाले. यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. सत्ताधारी केवळ या दिवाळीनंतर पाणी देवू, त्या दिवाळीनंतर पाणी देवू अशी आश्वासने देत आहे. परंतु, आश्वासन पाळण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. म्हणून सत्ताधार्‍यांनी देवपूरातील पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा नागरिकांसोबत ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशाराही श्री.देवरे यांनी यावेळी दिला.

सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडल्या. तसेच वारंवार समस्या मांडूनही प्रशासन दखल घेत नसल्याने आम्ही जेरीस आलो असल्याची कैफियत महापौरांकडे मांडली. परंतु यावर प्रशासनाने उत्तर दिले नाही.

मंजुरी मिळूनही कामांची वर्कऑर्डर एकदीड वर्षे काढली जात नाही. महापालिकेत दररोज फेर्‍या माराव्या लागतात. मोकाट कुत्रे, पाणी समस्यांसाठीही दहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरु आहे. परंतु, त्यावरही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. तसेच अक्कलपाडा पाणी योजनेच्या कामातही प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे दिरंगाई होत असल्याचा आरोप अमोल मासुळे यांनी केला. प्रभागातील गळतीमुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची समस्या वंदना भामरे यांनी मांडली. तसेच वेळोवेळी पाठपुरावा करुनही प्रशासनाकडून दखल घेत जात नसल्याने नाराजी व्यक्त केली. अमिन पटेल यांनी अल्पसंख्यांक भागातील कामांची बिले मुद्दाम अडवून ठेवली जात असल्याचा आरोप केला. तसेच विकास कामे होत नसल्याने यातून केवळ सत्ताधारी यांची नव्हे तर सर्वच नगरसेवकांची प्रतिमा खराब होत असल्याचे ते म्हणाले. शिवाय कधी नव्हे इतकी बिकट अवस्था पाण्यावाचून धुळेकरांची झाली असल्याचेही ते म्हणाले.

नगरसेविकेने झळकविला फलक!

नगरसेविका फातेमा अन्सारी यांनी मोकाट कुत्र्यांसाठी कोंडवाडा बांधण्याची मागणी करणारा फलक सभागृहात दाखविला. विशेष म्हणजे अशाप्रकारची मागणी त्यांनी यापुर्वी स्थायी समितीतही केली होती. त्यानंतरही दखल घेतली न गेल्याने आज त्यांनी फलकाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. या मागणीसंदर्भात त्यांनी महापौर कर्पे यांना निवेदनही दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या