Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपोलीस सेवेत अपघाती मृत्यू; कर्मचार्‍याच्या वारसाला आयुक्तांकडून १.१३ कोटींचा धनादेश

पोलीस सेवेत अपघाती मृत्यू; कर्मचार्‍याच्या वारसाला आयुक्तांकडून १.१३ कोटींचा धनादेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पोलीस सेवेत कार्यरत असतांना अपघाती मृत्यू झालेल्या एका पोलीस कर्मचार्‍याच्या वारसाला विमासह इतर असे एकूण 1 कोटी 13 लाख रूपयांचा धनादेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.

- Advertisement -

कै. पोलीस नाईक सचिन बाळासाहेब वाटाणे हे उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना 8 जुलै 2023 रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. पोलीस कर्मचार्‍यांना आणि अधिकारी यांच्या सॅलरी खात्यावर अक्सिस बँकेकडून अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला 1 कोटी 5 लाख रुपये देण्यात येते.

त्यानूसार अक्सिस बँकेतर्फे मयत कै. पोलीस नाईक सचिन वाटाणे यांच्या वरसदाराला या रकमेसह अक्सिस बँकेतर्फे सामाजिक बांधीलकी म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी 8 लाख रुपये देखील आज (दि.26) देण्यात आली आहे. या प्रमाणे एकूण एक कोटी तेरा लाख रूपये देण्यात आले.

विमा रक्कमेचा धनादेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते त्यांचे वारसदार श्वेता सचिन वाटाणे यांना देण्यात आला. यावेळी सहा. पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, अक्सिस बँकेचे क्लस्टर हेड दिनेश निचीत, गंगापूररोड शाखाप्रमुख राजश्री उदावंत, आनंदवल्ली शाखाप्रमुख संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या