अपघातग्रस्त कंटेनर उचलतांना क्रेन डांबरी रस्त्यावर उलटला

jalgaon-digital
2 Min Read

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजारतळाजवळील ओढ्यातील अरुंद पुलानजीकच्या अपघाती वळणावर अपघातग्रस्त मालवाहू कंटेनर उचलत असताना क्रेन रस्त्यावर उलटून अपघातग्रस्त होण्याची घटना घडली. लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर शनिवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास तळेगाव दिघे गावानजीक हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून क्रेनमधील दोघेजण बांलबाल बचावले.

तळेगाव दिघे येथील बाजारतळा नजीकच्या ओढ्यातील अरुंद पुलादरम्यान अपघाती वळण आहे. या अपघाती वळणावर रस्त्याच्याकडेला शुक्रवारी सकाळच्या सुमारास मालवाहू कंटेनर (क्र. एमएच 43 यु 7551) उलटून अपघातग्रस्त झाला होता. कंटेनर मुंबई येथून साहित्य घेवून नाशिककडून श्रीरामपूरच्या दिशेने जात होता. या अपघातातून कंटेनर चालक मोहम्मद दिलशाद (रा. सुलतानपूर. उत्तर प्रदेश) व क्लिनर (नाव समजू शकले नाही) असे दोघेजण बांलबाल बचावले. अपघातग्रस्त झालेला कंटेनर उचलण्यासाठी शनिवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास क्रेन पाचारण करण्यात आले होते. मात्र कंटेनर उचलत असतानाच क्रेन रस्त्यावर उलटला व क्रेनचा काही भाग कंटेनरच्या हूडवर पडला. क्रेनमधील रामा रोकडे व नामदेव रामकर (रा. नान्नजदुमाला) हे दोघे युवक बालंबाल बचावले.

अपघाताच्या घटनेनंतर ट्राफिक जाम झाला होता. रयत शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दिघे, अमोल दिघे, शरद महाराज ढवळे सहित युवकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी योगदान दिले. अपघातग्रस्त कंटेनर व रस्त्यावर उलटलेला क्रेन बाजूला घेईपर्यंत रस्त्यावर वाहनांची लांबच लांब राग लागली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तळेगाव दिघे येथील अरुंद पुलाचे व अपघाती वळण रस्त्याचे त्वरीत रुंदीकरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रयत शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दिघे यांनी दिला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *