Thursday, April 25, 2024
Homeजळगावसद्गुणांचा स्वीकार अन् दुर्गूणांची होळी!

सद्गुणांचा स्वीकार अन् दुर्गूणांची होळी!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सद्गुणांचा स्विकार (Acceptance of virtues) अन् दुर्गुणांचा त्याग (Abandonment of vices) करीत होळीचा सण (Holi festival) आज ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर होळी रे होळी पुरणाची पोळी अशी बोंब देण्यात आली.

- Advertisement -

हुताशन म्हणजे अग्नी. अग्नीपूजेची पौर्णिमा म्हणून ही हुताशनी पौर्णिमा (Hutashani full moon.). वाईट विचार अग्नीत बेचिराख करून नवी चैत्र पालवी मनात रुजविणारा हा सण. भक्त प्रल्हादाला (evotee Pralhad) मांडीवर घेऊन त्याला जाळण्याचा प्रयत्न करणारी, हिरण्यकश्यपूची भगिनी होलिका (Holika) ही आपल्याला पुराणात आढळते.

दुसर्‍याला जाळू शकण्याचे सामर्थ्य असलेली होलिका भक्त प्रल्हादाच्या निस्सीम भक्तीमुळे आणि विष्णूच्या (Vishnu) प्रल्हादावर असलेल्या कृपेमुळे स्वत:च जळून राख झाली अशी ही आख्यायिका प्रसिद्ध आहे. तेव्हापासून होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोनामुळे दोन वर्ष होळी सण साजरा करण्यावर निर्बंध होते. मात्र कोरोनाची परिस्थीती निवळल्याने हे निर्बंध शिथील करण्यात आले. त्यामुळे गुरूवारी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी होळीचा सण (Holi festival) मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. तसेच सुवासिनींकडुन होळीला पुरणपोळीचा नैवेद्यही दाखविण्यात आला.

हार, कंगनला वाढली मागणी

होळी सणानिमित्त साखरेच्या हार, (Sugar necklace) कंगनाला मोठी मागणी होती. 100 ते 120 रूपये किलो दराने हार, कंगनाची खरेदी करण्यात आली. लाखोंची उलाढाल झाल्याने बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या