Saturday, April 27, 2024
Homeनाशिकअल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक l Nashik

वारंवार संपर्क साधत ओळख वाढवून व दिशाभूल करून निर्जन ठिकाणी घेवून जात एकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

महेश मधुकर पाटील (२०, रा. शिवाजी नगर, गंगापूर शिवार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी रविवारी (दि. ४) सायंकाळी संशयितास अटक केली आहे.

याप्रकरणी पिडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित महेश याने ५ सप्टेंबर २०२० ते १ एप्रिल २०२१ दरम्यान फिर्यादीसोबत ओळख निर्माण करून तिच्याशी संपर्क केला. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध तिला बापू पुल येथे निर्जन स्थळी घेवून जात अत्याचार केले.

त्यानंतर पिडितेची संशयितास भेटण्याची इच्छा नसताना तिच्या घरासमोर येवून, फोन करून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी संशयितावर गंगापूर पोलीस ठाण्यात बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कोकाटे तपास करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या