Friday, April 26, 2024
Homeनगरमुलीस पळवून अत्याचार, आरोपींना 20 वर्ष सक्तमजूरी

मुलीस पळवून अत्याचार, आरोपींना 20 वर्ष सक्तमजूरी

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी येथील तीन आरोपींना श्रीगोंदा सत्र न्यायालयाने सक्त मजुरीसह, कैदेची शिक्षा सुनावली आहे. फिरोज चाँद मुलाणी, ओंकार शिवाजी कुलथे, अतुल बाळू आढाव सर्व राहणार दुरगाव (ता.कर्जत) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. कर्जत न्यायालयाचे न्यायाधीश मुजीब शेख यांनी ही शिक्षा सुनावली आहे. 1 जुन 2021 रोजी हा प्रकार घडला होता.

- Advertisement -

तालुक्यातील दूरगाव येथील अल्पवयीन पीडितेला फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेऊन तिला बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथे भाड्याच्या खोलीत ठेऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला होता. या प्रकरणात आरोपीला मुलगी पळवून नेण्यासाठी टेम्पो गाडी उपलब्ध करून पळवून नेण्यासाठी मदत केली होती. याबाबत महिला फिर्यादी यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्यादीवरून मुख्य आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुख्य आरोपी मुलाणी यावर 376 (2) (एन) अन्वये 10 वर्षे सक्तमजुरी, 5 हजार दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद. तसेच कलम 363 अन्वये 3 वर्षे शिक्षा व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 6 अन्वये 20 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे तर त्याला मदत करणारे आरोपी ओंकार शिवाजी कुलथे, अतुल बाळू आढाव यांच्यावर भादव कलम 363 अन्वये 3 वर्षे शिक्षा व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

गुन्ह्याचा तपास पुर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. पुष्पा कापसे यांनी काम पाहिले त्यांना सुमित पाटील यांनी फिर्यादीच्या वतीने मदत केली. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. कोर्ट अधिकारी आशा खामकर, नाना दरेकर यांनी काम पाहिल. आरोपींच्या शिक्षेसाठी कर्जत पोलिसांनी तपास केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या