Saturday, April 27, 2024
Homeनगरविद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत गुरूजींची शाळा सुरू

विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत गुरूजींची शाळा सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात 15 पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. करोनामुळे शाळेत विद्यार्थी हजर नसले तरी शिक्षकांना उपस्थित राहवे लागत असून ऑनलाईन अध्यापनाच्या तयारीसह अन्य कामे त्यांना करावी लागली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत शिक्षकांची शाळा सुरू झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यात 15 जूनपासून शंभर टक्के विद्यार्थी उपस्थित असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला असूून त्यासाठी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्र प्रमुख अन्य पर्यवेक्षण यंत्रणा आणि मुख्यालयातील अधिकारी अशा 767 जणांनी शाळांना भेटी त्या ठिकाणी शिक्षक हजर आहेत की नाहीत. त्यांनी सोपवून दिलेल्या जबाबदारनूसार कामकाज सुरू केले की नाही, याची खातजमा करण्यात येत आहे.

प्रत्यक्षात शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी शालेय कामकाजाच्या नियोजनासाठी शैक्षणिक वर्षाच्या पूर्व तयारीसाठी गुरूजी यांना शाळेत धाडण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी शाळा खोल्यांची स्वच्छता आणि निजुर्ंतूकीकरण करणे, परिसाराची स्वच्छता करणे, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, स्वच्छता गृहाची सुस्थिती, दाखल पात्र विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या नियोजनानूसार या समितीची बैठक घेणे, पाठ्य पुस्तकांची मागणी नोंदवणी, ऑनलाईन शिक्षणासाठी साहित्य तयार करणे, मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांचे व्हॉटसअप गु्रप पुन्हा सक्रिये करणे, पालक भेटीचे नियोजन करणे, ज्या विद्यार्थ्यांकडे संपर्काची कोणतीच साधने नाहीत, त्यांच्या घरी प्रत्यक्षात जावून त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या तयारीचे नियोजन करणे आदी कामे शिक्षकांवर सोपविण्यात आलेली आहेत. यामुळे विद्यार्थी हजर नसले तरी शिक्षकांची शाळा सुरू झाली असल्याचे म्हणण्यास हरकत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या