Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedनवजात भ्रूणाच्या 11 कवट्या अन् 56 अवयव गोबर गॅस टाकीत : डॉक्टरासह...

नवजात भ्रूणाच्या 11 कवट्या अन् 56 अवयव गोबर गॅस टाकीत : डॉक्टरासह चौघांना अटक

वर्धा जिल्ह्यातील आर्वीत (Aarvi)अल्पवयीन मुलीच्या झालेल्या गर्भपाताच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता. आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करून डॉ. रेखा कदमला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पथकाने तपासणी केली असता गोबर गॅसच्या टाकीत नवजात भ्रूणाचे 11 कवटी सदृश्य अवयव आणि 56 इतर अवयव सापडले आहेत. दरम्यान, वर्ध्यातील आर्वी (Aarvi) येथील गर्भपात प्रकरणाची चौकशी आता विशेष तपास पथकाद्वारे (SIT) होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर (Prashant Holkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

- Advertisement -

एका अल्पवयीन मुलीचा अधिकचे पैसे आकारून गर्भपात केल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी आर्वी पोलिसात देण्यात आली होती. या प्रकरणात मुलीसह आई वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. महिला डॉ. रेखा कदम यांना अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या तपासात गोबर गॅस मध्ये लहान हाडांचा सांगाडा सापडल्यानंतर आर्वी पोलिसांनी रेखा कदमसह चार जणांना अटक केली.

गोबरगॅस चेंबरमध्ये भ्रूण आणि हाडांचे अवशेष

पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस तपासणी केली असता गोबरगॅस चेंबरमध्ये भ्रूण आणि हाडांचे काही अवशेष सापडले आहेत. डॉ रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत नवजात भ्रूणाचे 11 कवटी सदृश्य अवयव आणि 56 इतर अवयव सापडले आहेत. यावरुन हे प्रकरण एकाच घटनेपर्यंत मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले.

रेल्वेचा प्रवास महागणार, वाचा कोणाला किती जास्त मोजावे लागणार पैसे

एसआयटीकडून तपास

वर्ध्यातील आर्वी (Aarvi) येथील गर्भपात प्रकरणाची चौकशी आता विशेष तपास पथकाद्वारे (SIT) होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर (Prashant Holkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, याप्रकरणातील ११ कवट्या ५४ हाडं आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. याप्रकरणी आरोपी महिला डॉक्टरनं आपला गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानुसार आरोपी डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं आहे.

गर्भपात प्रकरणाचा असा झाला भंडाफोड…

गेल्या काही दिवसांपूर्वी अनैतिक संबंधातून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिवस गेले होते. ती गर्भवती राहिल्यानंतर तिचे आई-वडील तिला जबरदस्तीने कदम हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी घेऊन आले होते. डॉ. रेखा कदम यांनी 4 जानेवारी रोजी पीडित मुलीला आपल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. नंतर 6 जानेवारीला तिचा गर्भपात करून स्टाफच्या मदतीने अर्भकाच्या अवशेषांची हॉस्पिटलच्या आवारातच विल्हेवाट लावली. हॉल्पिटलच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत अर्भकाचे अवशेष टाकून देण्यात आले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच 10 जानेवारीला डॉ. रेखा कदम यांच्यासह अल्पवयीन मुलीचे आई-वडिलांना देखील अटक करण्यात आली. नंतर परिचारिका संगीता काळे हिला देखील ताब्यात घेण्यात आले. दोघींच्या चौकशीमध्ये गर्भपात प्रकरणाचा भंडाफोड झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या