अभिषेक कळमकर यांचा शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यासंदर्भातील पत्र त्यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव खा. अनिल देसाई यांना पाठविले आहे. दरम्यान सुरक्षा आणि सुविधांच्या प्रश्नावर नगरकरांचे व्यापक संघटन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. अभिषेक कळमकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दादाभाऊ कळमकर उपस्थित होते.

राज्यातील आणि देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीत माझ्या क्षमतांचा व्यापक उद्दिष्टांसाठी उपयोग व्हावा, असे मला वाटते. शिवसेनेच्या मूळ भावधारेला अनुसरून परंतु वेगळ्या पद्धतीने यासंदर्भात काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. पक्ष नेते व शिवसैनिकांबाबत कसलीही नाराजी नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. अलिकडे झालेले भयावह राजकीय गुन्हेगारीकरण, त्यातून घडत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या, नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा या परिस्थितीवर व्यापक भूमिकेतून आक्रमक नागरी प्रतिसाद देण्याची आवश्यकता असल्याचे अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *