Thursday, April 25, 2024
Homeनगरराहुरी खुर्दमधून पुन्हा अल्पवयीन मुलीचे अपहरण

राहुरी खुर्दमधून पुन्हा अल्पवयीन मुलीचे अपहरण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातून (Rahuri Taluka) काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींचे अपहरण (Abduction of Minor Girls) होण्याच्या घटनेत वाढ झाल्याने पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण (Abduction of Minor Girls) होण्याची ही पाचवी घटना आहे. राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) राहुरी खुर्द परिसरातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अपहरण करून पळवून नेण्यात आल्याने पालकही (Parents) हतबल झाले आहेत. मागील अपहरण झालेल्या घटनांचा तपास लावण्यात राहुरी पोलीस अपयशी (Rahuri Police Failed) ठरल्याने नागरिकांनी राहुरीत (Rahuri) आता खमक्या पोलीस अधिकार्‍याची नेमणूक करण्याची मागणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

या घटनेतील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरात तिच्या आईवडिलांसोबत राहते. दि. 28 मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजे दरम्यान ती अल्पवयीन मुलगी पेपरला जाते, असे सांगून घरातून बाहेर गेली होती. ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत आली नाही. तिच्या नातेवाईकांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. आपल्या मुलीचे कोणीतरी अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची खात्री झाल्यानंतर अखेर त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

त्या अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांत अज्ञात इसमाविरोधात त्याच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार एकनाथ आव्हाड हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या