देवळाली प्रवरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

jalgaon-digital
1 Min Read

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) देवळाली प्रवरा (Deolali Pravara) येथे 16 वर्षे 5 महिने वय असलेली अल्पवयीन मुलीला (Minor Girl) तिच्या राहात्या घरातून अपहरण (Abduction) करून पळवून नेले. ही घटना दि. 26 फेब्रुवारी रोजी घडली आहे.

अल्पवयीन मुलगी (Abduction Girl) ही तिच्या आईवडिलांसोबत राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) देवळाली प्रवरा (Deolali Pravara) येथे राहते. दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजे दरम्यान ती अल्पवयीन मुलगी (Abduction Girl) तिच्या राहात्या घरातून बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. तिला संशयीत आरोपी अनिकेत गोरख चव्हाण रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी याने पळवून नेले आहे. असा तिच्या नातेवाईकांना संशय आहे.

त्या मुलीच्या आईने राहुरी पोलिसात (Rahuri Police) धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिकेत गोरख चव्हाण रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी याच्या विरोधात अपहरण (Abduction) केल्याचा गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार भिताडे हे करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *