Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याMP Sanjay Singh : आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून...

MP Sanjay Singh : आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक; सकाळपासून सुरू होती छापेमारी, काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली | New Delhi

आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party ) राज्यसभा खासदार संजय सिंह (MP Sanjay Singh) यांच्या दिल्लीतील घरी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज छापेमारी (Raid) केली होती. त्यानंतर सकाळपासून त्यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. यानंतर खासदार संजय सिंह यांना ईडीने नवीन दारू विक्री धोरण घोटाळ्यात (Liquor Sale Scam) अटक केली आहे…

- Advertisement -

Gas Cylinder Price News : मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; आता ‘इतक्या’ रुपयांना मिळणार LPG सिलेंडर

ईडीने याआधी मे महिन्यात खासदार संजय सिंह यांच्या घरावर (Home) छापे टाकले होते. त्यावेळी त्यांच्या साथीदारांच्या घरांवर आणि कार्यालयांमध्ये देखील शोधमोहीम राबवण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी ईडीने खासदार संजय सिंह यांच्या दिल्लीतील (Delhi) घरी छापेमारी केली होती. यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांना अटक (Arrested) करण्यात आली.

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, खासदार संजय सिंह यांना मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात (Court) हजर केले जाईल. तसेच यापूर्वी याचप्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांना फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. सध्या ते तुरुंगात असून सिसोदिया यांचा जामीन अर्ज कनिष्ठ आणि उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर आता त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे.

Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरला ईडीचे समन्स; चौकशीला हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

तसेच खासदार संजय सिंह यांना अटक झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून तथाकथित दारू घोटाळ्याबाबत (liquor Scam) बराच गाजावाजा होत असल्याचे आपण पाहत आहोत. मात्र भाजपला (BJP) एक पैसाही मिळालेला नाही. १ हजाराहून अधिक छापे टाकण्यात आले आणि कुठूनही वसुली झाली नाही. कधी शाळा साहित्य खरेदीत घोटाळा झाला, बस खरेदीत घोटाळा झाला असा आरोप भाजपने केला आहे. त्या प्रत्येक गोष्टीची चौकशी झाली. संजय सिंह यांच्याकडेही काहीही मिळणार नाही. पुढच्या वर्षी निवडणुका येत आहेत आणि भाजपला आपण हरणार आहोत असे वाटते, म्हणून हे पराभूत माणसाचे हतबल प्रयत्न वाटतात, असे त्यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis : २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना शरद पवारांचीच; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, खासदार संजय सिंह यांच्या अटकेची माहिती मिळताच त्यांच्या निवासस्थानाबाहेर आम आदमी पक्षाचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी (Activists) त्यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सिंह यांना अटक केल्यानंतर अधिकारी त्यांना ईडीच्या कार्यालयात नेणार आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

मोठी बातमी! पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला; अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री, चंद्रकात पाटलांची उचलबांगडी

- Advertisment -

ताज्या बातम्या