Friday, April 26, 2024
Homeनगरदीड वर्षांनंतर माय लेकीची भेट...

दीड वर्षांनंतर माय लेकीची भेट…

श्रीगोंदा |प्रतिनिधी|Shrigonda

श्रीगोंदा शहरातील (Shrigonda City) एक वस्तीजवळ भटकत आलेल्या महिलेला शहरातील (Women) नागरिकांनी आधार दिला होता.दीड वर्षापासून घरातून बेपत्ता झालेली ही महिला श्रीगोंदा येथे अत्यवस्थ अवस्थेत आढळून आली होती. तिच्यावर शासकिय दवाखान्यात उपचार (She was treated at a government hospital) करण्यात आले होते. यानंतर दक्ष नागरिक संघटनेचे दत्तात्रय जगताप आणि नारायण ढाकणे यांनी दोन दिवसांचा प्रवास करत उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) मूळ गावी या महिलेला सुखरूप पोहचवले.

- Advertisement -

सुमारे दीड वर्षांपूर्वी राजराणी नावाची महिला लेहेरगुंडी (जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश) येथून बेपत्ता झाली. 13 दिवसांपूर्वी ती मांडवगण रोडवर (Madavgan road) आढळून आली. तिची चौकशी करता अनेक गोष्टी समोर आल्या. यासंदर्भात डॉ. नितीन खामकर यांच्याशी फोनवर चर्चा करून 108 अ‍ॅम्बुलन्सने श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात (Shrigonda Rural Hospital) तिला आणले. नंतर 3 जुलै रोजी राजराणीला घेऊन दक्षचे दत्ताजी जगताप व नारायण ढाकणे उत्तर प्रदेशातील तिच्या घरी निघाले होते. आज 5 जुलै रोजी पोलीस निरिक्षक पंकज सिंग यांच्या समक्ष तिला पती गणेशच्या हवाली करण्यात आले. यावेळी तिची 8 वर्षाची मुलगी सिमा भांबावून गेली होती. वातावरण कमालीचे भावूक झाले. हे पाहून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. कुटुंबीयांच्या भेटीचा आनंद महिलेच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या