नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa
एक म्हैस दीड-दोन लाखाला विकली गेल्याचे ऐकले होते. मात्र शेळी…
- Advertisement -
एका शेळीची किंमत ऐकून तुम्ही सुद्धा चकित व्हाल. हो किंमत पण तशीच आहे, दीड लाख रुपये.
भेंडा येथील शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याची बोर जातीची एक शेळी चक्क ०१ लाख ५१ हजार रुपये किंमतीला विकली गेलीय.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील शेतकरी संदीप मिसाळ यांचा शेती पूरक शेळी पालनाचा (Goat Farm) व्यवसाय आहे. त्यांची एका शेळीची विक्री आज झाली. फलटण येथील शेळी पालन व्यवसाय करणारे तेजस भोईटे यांनी आज भेंडा येथे येऊन शेळी खरेदी केली. या एका शेळी साठी त्यांनी चक्क ०१ लाख ५१ हजार रुपयांची किंमत मोजली. यावेळी उद्योजक बापुसाहेब नजन, राजेंद्र तागड, बाळासाहेब मिसाळ, पिंटू वाघडकर आदी उपस्थित होते.