Friday, April 26, 2024
Homeनाशिकसाहित्य संमेलनासाठी आमदार देणार दहा लाखांचा निधी

साहित्य संमेलनासाठी आमदार देणार दहा लाखांचा निधी

नाशिक । प्रतिनिधी

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आपण आमदार निधीतून दहा लाख रुपये निधी देणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच इतर आमदारांनी देखील दहा लाखाचा निधी देण्याची तयारी दर्शवली…

- Advertisement -

जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी (दि.३०) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात भुजबळांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी प्रत्येक आमदाराने दहा लाख रुपये मदत द्यावी या भुजबळांच्या आवाहनाला उपस्थित सर्व आमदारांनी होकार दर्शवला. ९४ वे साहित्य संमेलन नाशिकच्या भुमित होणार आहे.

संमेलनाला वैज्ञानिक जयंत नारळीकर सारखे व्यक्तिमत्व अध्यक्ष म्हणून लाभले. देशभरातील साहित्यिक व रसिक या ठिकाणी येतील. त्याचे आदरातिथ्यात निधीची अडचण येउ नये म्हणून आपण आमदार निधीतून दहा लाख रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर आमदारांनाही मदत द्यावी असे ते म्हणाले.

आमदार खोसकर, दिलीप बनकर, सरोज अहिरे तयार झाल्या. सीमा हिरे यांनी देखील मान हलवत होकार दर्शवला. आता आ.कांदेंचा हात कोणीतरी वर करा असे भुजबळांनी म्हटल्यावर सभागृहात एकच हशा पिकला. आपण दहा लाख रुपये देऊ. त्यापैकी पाच लाख मंजूर करायचे की तीन लाख हे सरकार ठरवेल. पण आपण मदत दिली पाहिजे. मोठ्या संख्येने रसिक या ठिकाणी येणार असल्याने शहर स्वच्छ व सुंदर ठेव‍ा, अशा सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना केल्या.

साहित्य संमेलनासाठी दहा लाख निधी देण्याच्या विषय निघाल्यावर याबाबत होकार दर्शविण्यास आ.माणिकराव कोकाटे यांनी टाळले. भुजबळांनी हे बरोबर हेरत दराडे तुम्ही कोकाटेंची जबाबदारी घ्या असे गमतीने सांगितले. यावेळी कोकाटे यांनी साहेब तुम्हीच माझी जबाबदारी घ्या, असे म्हणताच सभागृह हसून हसून लोटपोट झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या