Wednesday, April 24, 2024
Homeनगर91 वर्षाच्या आजीबाईंनी केली करोनावर मात

91 वर्षाच्या आजीबाईंनी केली करोनावर मात

नेवासा फाटा |प्रतिनिधी| Newasa Phata

नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील मंदोदरी नारायण काळे या 91 वर्षाच्या आजीबाईंनी करोनावर यशस्वीरित्या मात केली.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, मंदोदरी काळे यांनी डोकें हातपाय दुखणे व थोडा सर्दीचा त्रास व्हायला लागला म्हणून् घरातच 2दिवस झोपूनच काढलें.

पण नंतर नेवासा फाटा येथे मुलाकडे आल्या. ट्रिटमेंट देण्याकरता नेवासा फाटा येथील डॉ. अमरनाथ काटे यांच्याकडे नेले. त्यांनी अगोदर करोनाची अँटीजन टेस्ट करण्याचं सुचवले. पण ती निगेटिव्ह आली, मग डॉक्टरांनी दोन दिवस औषधोपचार केलें, पण नंतर श्वसनाचा त्रास व्हायला लागल्यामुळें मग RTPCR test केली ती पॉजीटीव्ह आल्यानें ऑक्सिजन बेडसाठी नगर, औरंगाबाद येथें प्रयत्न केले.

पण बेड कोठे शिल्लकच नसल्यामुळे नेवासा फाटा येथील शुभम हॉस्पिटलचे डॉ. लोणारे, डॉ. वंजारी यांनी नंतर अवघ्या दोन तासात ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करुन दिली. डॉक्टरांचे अथक परिश्रम व योग्य औषधोपचारामुळे या वयात आजींनी करोनावर मात केली. आध्यात्माची व डॉक्टरांची जोड मिळाल्यामुळें पुनःश्च जिवनदान मिळाले असे उद्गार आजींने काढलें.

- Advertisment -

ताज्या बातम्या