Sunday, May 5, 2024
Homeजळगावजिल्ह्यात कोरोनाचे 63 रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे 63 रुग्ण

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात 16 फेब्रुवारी रोजी 63 नवे केरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 57 हजार 778 एवढी झाली आहे. दिवसभरात 35 बाधित रुग्ण कारोनामुक्त झाले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात जळगाव ग्रामीण, पाचोरा, भडगाव, एरंडोल, रावेर, या पाच तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जळगाव शहरात सर्वाधिक 29 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 55 हजार 890 जणांनी कोरोनावर मात केली आहे . तर दुसरीकडे आतापर्यंत 1 हजार 368 बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 29, भुसावळ 2, अमळनेर 3, चोपडा 2, धरणगाव 3, यावल 3, जामनेर 1, पारोळा 4, चाळीसगाव 10, मुक्ताईनगर 2, बोदवड 1 तर अन्य जिल्ह्यातील तीन असे एकूण 63 रुग्णांचा समावेश आहे.

दिवसभरात जळगाव शहरातील एका कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या