Wednesday, April 24, 2024
Homeजळगाव६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा : जळगाव केंद्रातून समर्थ बहुउद्देशीय...

६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा : जळगाव केंद्रातून समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे ‘अर्यमा उवाच’ प्रथम

मुंबई : Mumbai

६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत (61st Maharashtra State Amateur Marathi Drama Competition) जळगाव केंद्रातून (Jalgaon Centre) समर्थ बहुउद्देशीय संस्था, (Samarth Multipurpose Institution, Jalgaon)जळगाव या संस्थेच्या अर्यमा उवाच (Aryama Uvach) या नाटकाला प्रथम पारितोषिक (First Prize for Drama) जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने (Directorate of Cultural Affairs) प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. अर्यमा उवाच या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

Photos # राज्य नाट्य स्पर्धा 2022 : अर्यमा उवाचः पौराणिक प्रेम कहाणीचा प्रभावी नाट्याविष्कार

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जळगाव केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

इंदाई फाऊंडेशन, जळगाव या संस्थेच्या राशोमान या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि

कै. शंकररावजी काळुंखे चॅरिटेबल ट्रस्ट, जळगाव या संस्थेच्या मुसक्या या नाटकासाठी तृतीय

पारितोषिक प्राप्त झाले आहे.

दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक विशाल जाधव (नाटक- अर्यमा उवाच ),

द्वितीय पारितोषिक रमेश भोळे (नाटक- राशोमान), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक अभिषेक कासार (नाटक-मडवॉक), द्वितीय पारितोषिक रमेश लिला (नाटक-राशोमान), नेपथ्य: प्रथम पारितोषिक पियुष बडगुजर (नाटक-मडवॉक), द्वितीय पारितोषिक रविकुमार परदेशी (नाटक-अर्यमा उवाच),

रंगभूषा : प्रथम पारितोषिक योगेश लांबोळे (नाटक-अर्यमा उवाच), द्वितीय पारितोषिक सोनल राठोड ( नाटक- राशोमन) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक वैभव मावळे (नाटक-मडवॉक) व मोक्षदा लोखंडे (नाटक-अर्यमा उवाच), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे तेजसा सावळे (नाटक-मडवॉक), निवेदिता वागळे (नाटक- सुखांशी भांडतो आम्ही), मंजुषा भिडे (नाटक-मुसक्या), प्रतिक्षा झांबरे (नाटक- अजूनही चांदरात आहे), गायत्री ठाकूर (नाटक-एक रोझ), पंकज वागळे (नाटक-सुखांशी भांडतो आम्ही), अमोल ठाकूर (नाटक- मुसक्या), दिपक भट (नाटक- राशोमान), चंद्रकांत चौधरी (नाटक-काय डेंजर वारा सुटलाय), गणेश सोनार (नाटक-पुन्हा सलवा जुडूम).

दि. २४ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रभाकर दुपारे, गजानन कराळे,  अर्चना कुबेर यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या