Thursday, April 25, 2024
Homeनगर58 महसूल मंडळात मुसळधार

58 महसूल मंडळात मुसळधार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शुक्रवारी रात्री दहानंतर जिल्ह्यात अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. श्रीगोंदा, शेवगाव आणि श्रीरामपूर तालुक्यात सरासरी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शेवगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीत 107 मि.मी., शेवगाव तालुक्यातील चापडगावात 99 मि.मी. तर श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानमध्ये 96.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 132.2 टक्के पाऊस झाला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात दोन-तीन दिवस उघडीप होती. गुरूवारी आणि शुक्रवारी दिवसभर कडक ऊन होते. मात्र शुक्रवारी रात्री दहानंतर अनेक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यात 97 महसूल मंडळे असून त्यातील 58 ठिकाणी 20 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. तालुक्याच्या सरासरीत श्रीगोंदा 65, शेवगाव 64, श्रीरामपूर 56, कर्जत 44, नेवासा 38, पाथर्डी 36, पारनेर 27, राहुरी 26 आणि राहाता 23 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.

मंडळनिहाय पावसाच्या नोंदीमध्ये नालेगाव 24, वाळकी 23, पारनेर 21, वाडेगव्हाण 50, वडझीरे 38, निघोज 30, टाकळी 22, पळशी 29.5, श्रीगोंदा 82.3, काष्टी 32.2, मांडवगण 32.5, बेलवंडी 107, पेडगाव 50, चिंभळा 59.5, देवदैठण 77.8, कोळगाव 83.5, कर्जत 25, राशिन 40.3, भांबोरा 63.2, मिरजगाव 40, माहिजळगाव 34, शेवगाव 88, भातकूडगाव 52, चापडगाव 99.3, ढोरजगाव 55, एरंडगाव 77.3, पाथर्डी 24, माणिकदौंडी 21, टाकळीमानूर 73.8, कोरडगाव 29.3, मिरी 52.5, नेवासा खु 32, नेवासा बु 23, सलाबतपूर 28.3, चांदा 83.8, घोडेगाव 29.5, सोनई 38, वडाळा 47.5, ताराहाबाद 27.8, ब्राम्हणी 40.8, वांबोरी 44.5, समनापूर 22.8, घारगाव 33.5, साकूर 35.8, डोळासने 35.8, कोपरगाव 23.8, पोहेगाव 27.8, श्रीरामपूर 35.5, बेलापूर 31.5, उंदिरगाव 52.3, टाकळीभान 96.5, राहाता 21 आणि पुणतांबा 64 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या