Friday, April 26, 2024
Homeधुळेलग्न समारंभाला 500 जणांची परवानगी मिळावी

लग्न समारंभाला 500 जणांची परवानगी मिळावी

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

करोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे मंडप व लग्नसमारंभाशी निगडीत व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. असे सांगतांनाच

- Advertisement -

लग्नसमारंभासाठी 500 जणांना उपस्थितीची परवानगी मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी आज एकदिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.

ऑल महाराष्ट्र टेन्ट डिलर ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने आज एकाच दिवशी संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले.

धुळे जिल्हा मंडप असोसिएशन आणि सल्लग्न संघटनांनी धुळ्यात धरणे आंदोलन केले. लॉकडाऊनमुळे या व्यवसायावर आलेली अवकळा, उपासमारीची वेळ आणि यामुळे निर्माण झालेला जगण्याचा संघर्ष याचा विचार करता लग्नसमारंभासाठी आता 500 जणांच्या उपस्थितीची परवानगी मिळावी, लॉकडाऊन कालावधीतील वीज बिल माफ करावे. तसेच मंगल कार्यालय, लॉन्स, गोडाऊन, दुकाने यांचा कर माफ करावा. तसेच बँकेच्या कर्जावरील व्याज माफ करण्यात यावे या मागण्यांचा यात समावेश आहे.

धुळ्यातील आजच्या आंदोलनात दिलीप पारख, रमेश तलवारे, गोकुळ बुद्रुक, धनराज माळी, किशोर संचेती, पंकज ठाकूर, सुनिल सोनार, चिंतन पाटील, सुनिल यादव यांनी विशेष प्रयत्न केले. भुवन व लॉन्स असोसिएशनचे शशिकांत जोशी, लायटींग असोसिएशनचे भिकन चौधरी, घोडाबग्गी असोसिएशनचे सचिन गवळी, आचारी व केटरींग संघाचे रामेश्वर महाराज, फोटोग्राफर असोसिएशनचे अल्पेश शहा, साऊंड असोसिएशनचे ललित वाघ, पुरोहीत संघाचे शिवमहाराज आदिंनी सहभाग घेतला.

यांनी दिला पाठिंबा- आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने टेन्ट मंडप डेकोरेटर्स असोसिएशन, मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशन, लाईट अ‍ॅण्ड डिजे असोसिएशन, केटरींग, फ्लॉवर्स डेकोरेटर्स, इव्हेंट मॅनेजमेंट, फोटोग्राफी असोसिएशन, घोडा व बग्गी, बँड, वेडींग कार्ड प्रिंटीग, पुरोहित संघ, ऑर्केस्ट्रा व कलावंत आदी संघटनांनी पाठिंबा दर्शविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या