Thursday, April 25, 2024
Homeनाशिककॅन्टोमेन्ट हॉस्पिटलसाठी ५० लाखांचा निधी

कॅन्टोमेन्ट हॉस्पिटलसाठी ५० लाखांचा निधी

देवळाली कॅम्प | Deolali Camp

वाढत्या करोनाच्या संख्येचा विस्फोट होत असताना या रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची अत्यन्त गरज निर्माण झाली आहे.

- Advertisement -

कॅन्टोमेन्ट रुग्णालयात स्वनिर्मित ऑक्सिजन युनिट साठी मंजुरी मिळविण्या बरोबरच युनिटच्या उभारणी साठी इंडिया सीक्युरिटी प्रेस प्रशासनाने त्यांच्या सी.एस.आर. फंडातून ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच हे युनिट कार्यन्वित होऊन ऑक्सिजनचा तुटवडा भरुन काढण्यास मदत होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.

गेल्या दोन महिन्यांपासून देवळाली कॅम्पसह संपूर्ण परिसरात करोना बाधित रुग्णचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कॅन्टोमेंन्ट रुग्णालयात उपचारासाठी मोठी गर्दी होत आहे. येथील उपलब्ध बेड व रुग्ण संख्येत मोठी तफावत असल्याने प्रशासन मेटाकुटीला आले आहेत. अशातच या रुग्णालयात 80 बेड पैकी 30 बेड ऑक्सिजन बेड असून ही संख्या कमी पडत आहे,या ठिकाणी अधिकचे ऑक्सिजन युनिट उभारावेत, अशी मागणी जनतेकडून होत होती.

तीची दखल घेवून खा. गोडसे यांनी शासनाकडून अधिकचे 50 ऑक्सिजन बेड मंजूर करून घेऊन त्याचे उभारणी कामी इंडिया सीक्युरीटी प्रेस कंपनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांचे सी.एस.आर. फंडातून कॅन्टोमेंन्ट रुग्णालयात स्वनिर्मित ऑक्सिजन युनिट उभारणीकामी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता प्रेस प्रशासनाने ऑक्सिजन युनिट उभारणीसाठी तब्बल ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे.

या कामी खा. गोडसे याना प्रेसचे कामगार नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुद्रे यांच्यासह मजदूर संघाचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या