Thursday, April 25, 2024
Homeनगर5 नं. साठवण तलावाचा दगड, मुरूम रस्त्यांसाठी उपलब्ध करून द्या

5 नं. साठवण तलावाचा दगड, मुरूम रस्त्यांसाठी उपलब्ध करून द्या

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून 5 नंबर साठवण तलावाचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. या उत्खननामधून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारा मुरूम व दगड उपलब्ध करून द्यावा व नगरपरिषदेने उपलब्ध होणार्‍या दगड, मुरुमाचा उपयोग कोपरगाव शहरातील हद्दवाढ झालेल्या भागातील व उपनगरातील रस्ते तयार करण्यासाठी करावा, अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

- Advertisement -

आ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय बोरुडे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलेे, शहराचे प्रलंबित असलेले विकासाचे मुलभूत प्रश्न मार्गी लावताना आ. काळे यांनी कोपरगावकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 5 नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून मार्गी लावला आहे. येसगाव हद्दीत नगरपरिषद मालकीच्या इतर चार साठवण तलावाशेजारी या नवीन साठवण तलाव क्र. 5 चे काम युद्धपातळीवर सुरू असून दररोज मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत आहे. या उत्खननामधून मोठ्या प्रमाणावर मुरूम व दगड उपलब्ध होत असून दगड व मुरूम रॉयल्टीवर देण्याबाबत प्रशासनाकडून वृत्तपत्राद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

यावेळी सुनील गंगुले, विरेन बोरावके, संदीप पगारे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे, बाळासाहेब रुईकर, संदीप कपिले, धनंजय कहार, ऋषीकेश खैरनार, आकाश डागा, सचिन गवारे, मनोज नरोडे, तेजस साबळे, बाळासाहेब सोनटक्के, विलास आव्हाड, एकनाथ गंगुले, राकेश शहा, चांदभाई पठाण, विकी जोशी, फिरोज पठाण, जुनेदशेख, पीरसाहब पठाण, आशा भोसले, सुरेश दुशिंग, नारायण पवार, वाल्मिक पवार, आधार पवार, वाल्मिक भोसले, संगीता जाधव, सिताराम लव्हाळे, गोरख लव्हाळे, संतोष लव्हाळे, संतोष लव्हाळे, नामदेव लव्हाळे, सखाराम भोसले, बाबासाहेब भोसले, नाना जाधव, यादव पवार, सहादू पवार, यशवंत पवार, वामन चव्हाण, बबन चव्हाण, दादाभाऊ चव्हाण, अशोक बाबर, रामनाथ लोणारी, गोरख पवार, मच्छिंद्र पवार, जालिंदर पवार, दीपक सोनवणे, अंकुश झुंजारराव, अमित झुंजारराव, बाळू साळुंके आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या