Sunday, April 28, 2024
Homeनाशिकब्रह्मा व्हॅलीत विद्यार्थ्यांना 'थ्रीडी मॉडेलिंग युझींग स्केचअप सॉफ्टवेअर'चे धडे

ब्रह्मा व्हॅलीत विद्यार्थ्यांना ‘थ्रीडी मॉडेलिंग युझींग स्केचअप सॉफ्टवेअर’चे धडे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

ब्रह्मा व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयात (brahma valley engineering college) स्थापत्य अभियांत्रिकी ( Civil Engineering) विभागातर्फे थ्रिडी मॉडेलिंग युझिंग स्केचअप सॉफ्टवेअर” (3d modelling using catch up software) या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनार नुकतेच संपन्न झाले…. (International webinar)

- Advertisement -

यावेळी उदयशंकर रामास्वामी (udayshankar ramaswami ) यांनी विद्यार्थी, प्राध्यापक, स्थापत्य क्षेत्रातील उद्योजक यांना स्केचअप सॉफ्टवेअरचा उपयोग तसेच वापरासंदर्भात मार्गदर्शन केले उदयशंकर रामास्वामी हे तामिळनाडू येथील बी.टी. आर. कन्स्ट्रक्शनमध्ये व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत आहेत.

वेबिनार अतिशय उपयुक्त ठरल्याचे मनोगत सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि उद्योजक यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास देश तसेच विदेशातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे वेबिनार विद्यार्थी, शैक्षणिक मान्यवर उद्योजक सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. एच. एन. कुदळ तसेच स्थापत्य विभागप्रमुख प्रा. कौस्तुभ सराफ यांचे मार्गदर्शन लाभले. विभागातील समस्त प्राध्यापकांच्या परिश्रम व सहकार्याने वेबिनार संपन्न होण्यास मदत झाली. प्रा.अभिजित ठाकरे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या