Thursday, April 25, 2024
Homeनगर31 जुलैपर्यंतच वरिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया

31 जुलैपर्यंतच वरिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

अंतिम वर्षातील अखेरच्या सत्राच्या परीक्षेचा घोळ अद्याप कायम असतानाच दुसरीकडे वरिष्ठ महाविद्यालयांनी उर्वरीत वर्गांची प्रवेश प्रक्रिया 31 जुलैपर्यंत उरकून 1 ऑगस्टपासून ऑनलाईन वर्ग सुरू करावेत असे विद्यापीठाचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे नगर शहरातील काही महाविद्यालयांत आजपासून (बुधवार) प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होत आहे.

- Advertisement -

करोनाच्या संकटामुळे यंदा वरिष्ठ महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यात अंतिम वर्षातील शेवटच्या सत्राची परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या सूचना आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारने या परीक्षांना विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या परीक्षांबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. परंतु पदवी, पदव्युत्तर किंवा व्यावसायिक अयासक्रमाच्या इतर वर्गांची प्रवेश प्रक्रिया राबवण्याबाबत विद्यापीठाने महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत.

20 जुलैपर्यंत पदवीच्या प्रथम, द्वितीय, तसेच पदव्युत्तरच्या प्रथम, शिवाय इतर व्यावसायिक अयासक्रमाचे प्रथम, द्वितीय वर्षाचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात मंगळवारी काही वर्गांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयांतील वर्गांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होत आहे.

31 जुलैपर्यंत या वर्गांचे प्रवेश उरकून 1 ऑगस्टपासून ऑनलाईन वर्ग ारवण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. त्याप्रमाणे नगर शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालयांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यंदाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आहे. प्रत्येक महाविद्यालयाने आपापल्या संकेतस्थळावर त्याची तयारी करून ठेवली आहे.

निकाल लागताच संकेतस्थळावरून अर्ज उपलब्ध होतीत. हे अर्ज ऑनलाईन भरून आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन जोडून व त्याचे प्रवेश शुल्कही ऑनलाईनच भरायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्याची गरज राहणार नाही. दरम्यान, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशासाठी अडचणी येणार आहेत. स्मार्टफोन किंवा नेटवर्कची समस्या असल्याने या मुलांना प्रवेशासाठी महाविद्यालयांनी सहकार्य करून सामावून घ्यावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या