Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याबिहारच्या औरंगाबादमध्ये सिलेंडरचा स्फोट; ३० जण होरपळले

बिहारच्या औरंगाबादमध्ये सिलेंडरचा स्फोट; ३० जण होरपळले

नवी दिल्ली | New Delhi

बिहारच्या औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात शॉर्टसर्किटमुळे (Short Circuit) भीषण आग (Terrible Fire) लागल्याची घटना घडली असून या शॉर्टसर्किटनंतर गॅस सिलिंडरचा स्फोट (Gas cylinder explosion) झाल्यामुळे या स्फोटात ३० हून अधिकजण होरपळले आहेत. तसेच १० जण गंभीर जखमी आहेत…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छट पुजेचा (Chhat Puja) प्रसाद बनवत असताना अचानक गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने ही घटना घडली. तर घटनेनंतर सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात ( Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस (Police) कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. तसेच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आलेले ७ जण देखील या आगीत होरपळले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या