Thursday, April 25, 2024
Homeजळगावकासोदा -आडगाव दरम्यान अपघातात ३ मृत्युमुखी

कासोदा -आडगाव दरम्यान अपघातात ३ मृत्युमुखी

कासोदा Casoda ,ता. एरंडोल ( प्रतिनिधी)

एरंडोल तालुक्यातील कासोदा आडगाव रस्त्यावर (Kasoda on Adgaon Road) इंडिका (Indica) व दुचाकी (two-wheeler) यांच्यात समोरासमोर टक्कर (Collision) झाली असून त्यात, मोटरसायकल स्वार ठार (Killed) झाले आहेत. सदर मयत झालेले तीनही मुले कासोदा येथील फासेपारधी असल्याचे समजते.

- Advertisement -

सदर चारचाकी गाडी ही अंचलगाव तालुका भडगाव येथील होती. त्यात महिला प्रवासी होते .त्याही जखमी झाल्या .चार चाकी चा चालक व महिला खाजगी उपचारासाठी धुळे येथे गेलेत, तर मोटरसायकलस्वार यांना कासोदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, मयत घोषित केले. सदर घटनेसंदर्भात पोलीस स्टेशनचे कर्मचारी तपास करत असून, अपघातस्थळी वनकुटे बांबोरी चे सरपंच उमेश पाटील ,राहुल मराठे, सागर शेलार ,शैलेश मंत्री ,क्षिरसागर व आडगाव कासोदे ग्रामस्थांनी मदत केली .त्यासंदर्भात पूर्ण माहिती उशीरापर्यंत उपलब्ध झाली नाही. कासोदा पोलीस स्टेशनचे अधिकारी तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या