Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेश२६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला पाकिस्तानात अटक

२६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला पाकिस्तानात अटक

दिल्ली । Delhi

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या जकीउर रहमान लखवीला टेरर फंडिंग प्रकरणात अटक झाली आहे.

- Advertisement -

दहशतवाद्यांना आर्थिक मदत दिल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या पंजाबमध्ये लखवीला अटक करण्यात आली. आंतरराष्ट्रीय दबाव वाढू लागल्यामुळे पाकिस्तानने लखवी विरोधात कारवाई केली आहे.

दहशतवाद्यांची मदत करणे आणि त्यांना फंडिंग केल्याप्रकरणी लखवीवर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई हल्ल्याचा कट रचणे आणि त्याच्या अंमलबजावणीत हाफिज सईद याच्यासोबत झाकी उर रेहमान लखवी याचा हात होता.

यापूर्वी आलेल्या माहितीनुसार मुंबईवर झालेल्या २६/११ या अतिरेकी हल्ल्याचा कट, आखणी आणि अंमलबजावणीत लखवी यांचा थेट सहभाग होता. २६/११ च्या हल्ल्यापूर्वी लखवीने डेव्हिड हेडलीला पुन्हा काम करण्यासाठी कसे राजी केले, मार्गदर्शन केले याविषयीही तपास सुरू झाला आहे. लष्कर-ए-तैयबा या अतिरेकी संघटनेचा कमांडर लखवीला संयुक्त राष्ट्र संघाने मुंबई हल्ल्यानंतर जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केलं होतं. मुंबई हल्ल्याच्या चौकशीदरम्यान हाफिस सईदला दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण योजना तयार करण्याचे काम लखवीने दिले होते. या हल्ल्यात, पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेतील अतिरेक्यांनी मुंबई शहरात अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात १६६ लोक ठार झाले, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. अनेक निरपराध लोकांच्या मृत्यूचा कट आखणाऱ्या लखवीला सुमारे सहा वर्षांच्या कोठडीनंतर एप्रिल २०१५ मध्ये पाकिस्तानच्या तुरुंगातून सोडण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या