Friday, April 26, 2024
Homeजळगावनगाव येथे 25 वर्षीय तरुणाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू

नगाव येथे 25 वर्षीय तरुणाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू

पारोळा Parola

तालुक्यातील नगांव येथील शरद अनिल पाटील (Sharad Anil Patil) (वय 25 वर्षे ) हा आज 25 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास नगांव शिवारातील शेतातील विहिरीच्या (well) पाण्यात बुडुन (Drown) मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

आज 25 रोजी शरद अनिल पाटील हा शेतात पाणी भरणे कामी सकाळी 7 वाजता गेला होता.

सकाळी 8.00 वाजेच्या पुतण्या व सून असे नगांव शिवारातील त्यांचे शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी शेतात असलेल्या त्यांचा लहान भाऊ शरद यास आवाज दिला असता तो शेतात मिळुन न आल्याने त्यांनी विहीरी जवळ जावुन पाहीले असता शरद हा शेतातील विहीरीच्या पाण्यात पडलेला दिसला.

याबाबत प्रकाश ओंकार पाटील यांनी पारोळा पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास प्रविण पाटील हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या