Friday, May 10, 2024
HomeजळगावBreaking अरे बापरे मेलेले २२ बैल फेकले नदी पात्रात ; जिल्ह्यात...

Breaking अरे बापरे मेलेले २२ बैल फेकले नदी पात्रात ; जिल्ह्यात खळबळ

रावेर|प्रतिनिधी raver चिनावल ता.रावेर – वार्ताहर

चिनावल-उटखेडा गावादरम्यान असलेल्या सुकी नदीच्या पुलाखाली दि.१६ शुक्रवारी सकाळी तब्बल २२ बैल कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.या ठिकाणी निंभोरा व सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी फौजफाट्यासह हजर झाले होते. चिनावल येथील गावकऱ्यांच्या मदतीने मृत बैलाला जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून पुरवण्यात आले आहे.

- Advertisement -

Photo# धुळे : स्वच्छतेसाठी एकवटले जिल्हा प्रशासन

शुक्रवारी सकाळी शेतात जाणाऱ्या मजुरांना पुलाजवळ दुर्गंधी आल्याने या घटनेचे बिंग फुटले. याबाबत चिनावल गावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली असता, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी व निंभोरा पोलीस स्टेशनचे सपोनि धुमाळ घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर पुलापासून तब्बल दीड किमी अंतर वाहून गेलेल्या बैलाला काढून जेसीबीच्या साहाय्याने खड्डा करून पुरवण्यात आले आहे.

यावेळी चिनावल येथील श्रीकांत सरोदे, हितेश भंगाळे, निलेश गारसे, विशाल बोरोले, योगेश पाटील, गजू साळुंके, किरण महाजन, वैभव नेमाडे व पशु संवर्धन विभागाचे डॉ लहासे, राजपूत, धांडे उपस्थित होते, सदरील बैल गुरांची तस्करी करतांना गुदमरुन मेलेले असल्याने या ठिकाणी फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी देखील याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत गायी आढळून आल्या होत्या. या रस्त्याच्या वापर गुरांची तस्करी करण्यासाठी होत असल्याने, पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या