दुर्ग भ्रमंतीसाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा रामशेज किल्ल्यावर मृत्यू

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । Nashik

रामशेज किल्ल्यावर (Ramshej Fort) दुर्ग भ्रमंतीसाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाला (Young Man) हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे….

याबाबत सविस्तर माहिती अशी की,नवीन नाशकातील (Navin Nashik) शिवपुरी चौकात (Shivpuri Chowk) राहणारे नारायण सरोवर हे आपल्या कुटुंबियांसमवेत शनिवार (दि.३०) रामशेज किल्ल्यावर गेले होते. यावेळी त्यांचा मुलगा अजय सरोवर (Ajay Sarovar) (वय २०) हा चक्कर येऊन पडल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, अजय हा महाविद्यालयीन शिक्षण (Education) घेत होता तर त्याच्या वडिलांचा फळाचा व्यवसाय आहे. अजयच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिकपासून उत्तरेत अवघ्या १४ किलोमीटर वर असलेल्या रामशेज किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात,शनिवार,रविवार किल्ल्यावर बेसुमार गर्दी असते,सध्या तर पावसाळी पर्यटकांचा मोठा वावर आहे. यात टवाळहुल्लडबाजी करणारे अधिक आहेत,आम्ही आजपर्यंत कित्येक पत्रे देऊनही वनविभाग व पोलीस यंत्रनेचे पायथ्याला नोंदणी चौकी उभारली जात नाही. शनिवार रविवार किल्ल्याला पोलीस संरक्षण नसते,असा असुरक्षित रामशेजवर अनेक अपघात,छेडछाड,अनुचित प्रकार घडतात,त्यातून जीवघेणे अपघात नेहमीचेच याकडे मात्र वनविभाग,पोलीस यंत्रणा,दिंडोरी तहसीलदार यांनी अधिक लक्ष घालून किल्ल्यावर जाणाऱ्या येणाऱ्यांची नोंदणी कक्ष उभारणी व सुरक्षित पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्न व किल्ल्यावर पोलीस तैनात करावे.तेव्हाच अपघात थांबतील.

राम खुर्दळ (संस्थापक, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *