Friday, April 26, 2024
Homeनाशिकवाहतूक पोलिसाने केली १८ लाखांची फसवणूक

वाहतूक पोलिसाने केली १८ लाखांची फसवणूक

नाशिक | Nashik

भारतीय रेल्वेच्या ईस्टर्न रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून टीसी पदाची गव्हर्ननस ऑफ इंडिया नावाने बनावट ऑर्डर तयार करून दोघा जणांची सुमारे १८ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी नाशिक पोलिस आयुक्तालयातील वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यासह दोघांवर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फसवणूक प्रकरणी हनुमानवाडीत राहणाऱ्या बाबाजी रामजी केदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी संशयित रमेश मोतीगिर गोसावी व नगर जिल्ह्यातील वैजबाभूळ येथिल सचिन भाऊसाहेब म्हस्के या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित गोसावी व म्हस्के यांनी नोव्हेंबर २०१४ ते मे २०१६ या काळात केदारे व त्यांचा नातेवाईक स्वप्निल महेंद्र बागुल यांना विश्वासात घेऊन त्यांना इस्टर्न रेल्वेत टीसी पदावर नोकरीला लावून देतो असे सांगून वेळोवेळी १८ लाख रुपये घेऊन त्यांना बनावट टीसी नियुक्तीपत्र सादर केले.

फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता त्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एस. शिंदे तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या