Friday, April 26, 2024
Homeनगर15 व्या वित्त आयोगाचा जिल्ह्यासाठी 15 कोटींचा निधी

15 व्या वित्त आयोगाचा जिल्ह्यासाठी 15 कोटींचा निधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन 2020-2021 या आर्थिक वर्षातील राज्यातील मनपा, पालिका, नगरपंचायतींना 305 कोटींचा मुलभूत

- Advertisement -

अनुदानाचा दुसरा हप्ता वितरीत करण्यास नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे. त्यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 15 कोटी 8 लाख, 3 हजार 981 रुपये येणार आहेत.

15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाकडून संदर्भाधीन आदेशान्वये मुक्त करण्यात आलेला सन 2020-2021 या आर्थिक वर्षातील छेप-चळश्रश्रेप झर्श्रीी उळींळशी गटासाठी मुलभूत अनुदानाचा दुसरा हप्ता रु. 305 कोटी छेप -चखश्रळेप झर्श्रीी उळींळशी गटातील सर्व पात्र ड वर्ग महानगरपालिका, नगरपरिषदा व नगर पंचायतींना तसेच कटक मंडळाना(लोकसंख्या) क्षेत्रफळ या निकषाच्या आधारे निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. 305 कोटी इतकी रक्कम, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानां वितरित करण्यात येणार आहे.

असा मिळणार निधी

अहमदनगर मनपा- 4 कोटी 94 लाख, 61 हजार, 312 रूपये श्रीरामपूर नगरपरिषद-1 कोटी 23 लाख, 61 हजार, 824 रूपये संगमनेर नगरपरिषद-94 लाख, 89 हजार, 350 रूपये कोपरगाव नगरपरिषद-91 लाख, 91 हजार, 493 रूपये राहुरी नगरपरिषद-68 लाख, 69 हजार, 187 रूपये राहाता नगरपरिषद-38 लाख, 77 हजार, 494 रूपये श्रीगोंदा नगरपरिषद-75 लाख, 37 हजार, 324 रूपये देवळाली नगरपरिषद-58 लाख, 78 हजार, 719 रूपये पाथर्डी नगरपरिषद-49 लाख, 74 हजार, 877 रूपये नेवासा नगरपरिषद-44 लाख, 26 हजार, 698 रूपये शिर्डी नगरपंचायत-53 लाख, 50 हजार,416 जामखेड नगरपरिषद-78 लाख, 85 हजार,752 अकोले नगरपंचायत-31 लाख, 96 हजार,991 कर्जत नगरपंचायत-44 लाख, 27 हजार,199 पारनेर नगरपंचायत-39 लाख, 22 हजार,875 शेवगाव नगरपंचायत-75 लाख, 28 हजार,514 अहमदनगर कटकमंडळ-44 लाख, 13 हजार,875.

- Advertisment -

ताज्या बातम्या