Thursday, April 25, 2024
Homeनगरवैजापुरात सापडले तब्बल दिडशे वर्षांपूर्वीचे मानवी अवशेष

वैजापुरात सापडले तब्बल दिडशे वर्षांपूर्वीचे मानवी अवशेष

वैजापूर | प्रतिनिधी

वैजापूर येथे नवीन तहसिल कार्यालयाच्या प्रशासकिय इमारतीचे बांधकाम सुरु असतांना शुक्रवारी सायंकाळी मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले. सुमारे दिडशे वर्षांपुर्वीचे हे अवशेष असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटना औत्सुक्याचा विषय ठरली आहे. वैजापूर शहरात जुन्या तहसिल कार्यालयाच्या जागेवर मागील काही दिवसांपासुन प्रशस्त नविन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे.

- Advertisement -

धक्कादायक! विवाहितेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक अत्याचार

शुक्रवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास कामगारांना पायाच्या भिंतीमध्ये मानवी देहाचे अवशेष आढळुन आले. वैजापुर येथील जुनी तहसिल कार्यालयाची इमारत ही जवळपास एकशे तीस वर्षांपुर्वीचे असुन ही इमारत पाडण्यात आली आहे.‌ नविन इमारतीच्या पायाचे खोदकाम प्रगतीपथावर आहे.‌ पायासाठी जवळपास दहा फुटांचे खोदकाम केल्यानंतर पायाच्या भिंतीमध्ये कामगारांना मानवी देहाचे अतिशय जीर्ण अवस्थेतील अवशेष आढळुन आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत तातडीने महसुल प्रशासनाला कळवले असुन पोलिसांनाही कळवण्यात आले आहे. हे अवशेष अद्याप भिंतीमध्येच असुन यावर कार्यवाही करण्याचे सर्वाधिकार महसुल प्रशासनाला असल्याने तहसिल कार्यालयामार्फत पंचनामा केल्यानंतरच याबाबत निश्चित कार्यवाही करण्यात येईल. याबाबत शनिवारी प्रशासकिय कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO

- Advertisment -

ताज्या बातम्या