Friday, April 26, 2024
Homeनाशिकलासलगाव सायक्लिस्ट क्लबची 150 कि.मी. रॅली

लासलगाव सायक्लिस्ट क्लबची 150 कि.मी. रॅली

लासलगाव | Lasalgoan

लासलगाव सायक्लिस्ट क्लब ने लासलगाव ते वणी गड व पुन्हा लासलगाव अशी 150 कि.मी. सायकल रॅली काढुन रोगप्रतिकारशक्ती हीच तुमची लस असा समाजप्रबोधनपर संदेश दिला.

- Advertisement -

मागील 9 महिन्यांपासून सर्व जग हे करोनाशी लढत आहे.

परंतु कुठलीही ठोस औषध उपचारपद्धती अजुनही उपलब्ध होऊ शकलेली नाही व येणारी करोना लस ही किती प्रमाणात उपयोगी ठरेल यात साशंकता आहे. सध्या करोनाचा रिकव्हरी रेट हा 92 टक्के झाला आहे. त्याचे कारण म्हणजे भारतीय लोकांमध्ये तयार होत असलेली रोगप्रतिकारशक्ती व ती वाढवण्यासाठी व्यायामाशिवाय पर्याय नाही.

त्यासाठी लासलगाव सायक्लिस्ट असोसिएशनने समाजप्रबोधनपर लासलगाव-वणी गड-लासलगाव अशी सायकल रॅली काढुन असा संदेश दिला. 9 महिन्यापूर्वी सुद्धा या सायकल ग्रुपने लासलगाव ते त्र्यंबकेश्वर अशी सायकल रॅली काढुन स्वच्छतेचा सामाजिक संदेश दिला होता.

सायकल ग्रुपचे अध्यक्ष अनिल ब्रम्हेचा, संजय पाटील, डॉ. किरण निकम, डॉ. अनिल ठाकरे, तुषार लोणारी, महेश वर्मा, व्यंकटेश वाबळे, अमोल गंगेले, विजु कुंदे, संजय कदम, कन्हैया पटेल यांनी सहभाग घेतला. या रॅलीसाठी रुपेश ट्रेडिंग कंपनीचे सहकार्य लाभले आहे. लासलगाव सायक्लिस्ट क्लब नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या