Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकलासलगाव : देवगाव येथील १५ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग

लासलगाव : देवगाव येथील १५ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग

लासलगाव | Lasalgoan

देवगाव येथील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमावर लासलगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे.

- Advertisement -

रविंद्र अशोक चौधरी ( वय ३० रा.मानोरी) असे या इसमाचे नाव आहे.

निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर जी वाघमारे यांनी त्यास तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की (दि. २२) मंगळवारी दुपारी देवगाव येथे ही मुलगी घरी जात असतांना लोखंडी पुलाजवळ रविंद्र अशोक चौधरी हा सायकल वरून येत असताना अल्पवयीन मुलीस थांबविले तीने थांबण्यास नकार दिल्यावर आरोपीने तिला बळजबरीने रस्त्याच्या बाजुला नेऊन तिचेवर अतिप्रंसंग केल्याची घटना घडली.

यावेळेस पीडित अल्पवयीन मुलगी ही बचावासाठी आरडाओरड केली म्हणून तिला संशयिताने मारहाण करत अतिप्रसंग केला.

याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होताच लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे व पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे यांच्यासह पोलिस पथकाने गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

संशयितास न्यायालयात हजर केले असता जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड .रामनाथ शिंदे यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायाधीश आर जी वाघमारे यांनी तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली .

- Advertisment -

ताज्या बातम्या