Saturday, April 27, 2024
Homeनगर14 गावांना मंगळवारी आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण

14 गावांना मंगळवारी आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्यावतीने आर. आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण सोहळ्याचे मंगळवारी नगरच्या माऊली संकुल सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

यावेळी जिल्ह्यातील 14 गावांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी राज्याचे ग्रामविकास तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष राजश्री घुले आहेत.

कार्यक्रमासाठी महापौर बाबासाहेब वाकळे खासदार डॉ. सुजय विखे, खा.सदाशिव लोखंडे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद् क्षिरसागर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख, बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्कारासाठी डोंगरगाव (अकोले), निमगाव बु (संगमनेर), करंजी (कोपरगाव), जाफराबाद आणि मुठेवडगाव विभागून (श्रीरामपूर), खडकेवाके (राहाता), सडे (राहुरी), वडाळा बहिरोबा (नेवासा), राक्षी (शेवगाव), चिचोंडी (पाथर्डी), खर्डा (जामखेड), कानगुडवाडी व कोपर्डी विभागून (कर्जत), मढेवडगाव (श्रीगोंदा), जामगाव (पारनेर), टाकळी खातगाव (नगर) यांची निवड करण्यात आली आहे.

यासह जिल्हास्तरावर 2018-19 साठी ग्रामपंचायत खडांबे (ता. राहुरी) आणि वाळवणे (ता. पारनेर) यांची विभागून निवड करण्यात आली आहे. 2019-20 साठी गणोरे ग्रामपंचायत (ता. अकोला) आणि आव्हाणे बु (ता. शेवगाव) विभागून, 2020-21 साठी निमगाव बु ग्रामपंचायत (संगमनेर) आणि खडकेवाके (ता. राहाता) यांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या