लाचखोर चव्हाणकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दि. २६ ऑगस्टला नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या वस्तू व सेवा कर विभागाचा (CGST) अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके (Chandrakant Chavhanke) याला सीबीआयच्या (CBI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ हजार रुपयांची लाच घेतांना सापळा रचत अटक (Arrested) केली…

या लाचखोर अधिकाऱ्याला २७ ऑगस्टला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. आज सीबीआय कोठडी संपल्याने चव्हाणकेला पुन्हा कोर्टात हजर केले. आता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, एका व्यावसायिकाचे जीएसटी रजिस्टेशन निलंबित करण्यात आले होते ते पुन्हा सुरु करण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागाचे अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके याने आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

यावरून तक्रारदाराने सीबीआय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयात फोनवरून संपर्क करून तक्रार दिली असता पोलीस उपमहानिरीक्षक राजेश प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक तात्काळ नाशिक येथे आले.

तक्रारदाराशी संपर्क साधून नवीन नाशकातील केंद्र सरकारच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या कार्यालयात सापळा रचला. यावेळी अधीक्षक चव्हाणके याला आठ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *