Thursday, April 25, 2024
Homeजळगावपारोळ्यातील 130 क्विंटल कापूस लंपास

पारोळ्यातील 130 क्विंटल कापूस लंपास

पारोळा – Parola – प्रतिनिधी :

येथील कापूस व्यावसायिकांनी एका खाजगी ट्रान्सपोर्ट मार्फत कापूस भरून बाहेरगावी विक्रीसाठी पाठवली असता ट्रक व 130 किंटल कापूस चालकांनी लंपास केला असल्याची घटना घडली.

- Advertisement -

याबाबत पारोळा पोलिसात योगेश प्रकाश भोसले रा भोसले गल्ली कापूस व्यापारी यांनी फिर्याद दिली की दि 15 रोजी एका खाजगी ट्रान्सपोर्ट मार्फत कापूस भरण्यासाठी बोलावला होता.

त्यानुसार त्या ट्रास्पोर्टने पारोळा येथे ट्रक नंबर आर जे 22 जी ए -0656 नंबर वर ट्रक चालक सारवान राम पूर्ण नाव माहित नाही व क्लीनर नाव गाव माहित नाही 28 वर्ष यांनी पारोळा येथून दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरातून गोडाऊन येथून 130 क्विंटल कापूस भरला व तो सहा लाख 63 हजार रुपये किमतीचा भरून नेला .

सदर माल हा योगेश प्रकाश भोसले व मित्र पंढरीनाथ धनराज पाटील, किशोर गजानन दुसाने, नामदेव दामू वाघ यांनी घेतलेला कापूस ट्रक वरील चालक व क्लिनर यांनी ठरल्याप्रमाणे बाहेर गावी पाठवला असता त्या पत्त्यावर न नेता ट्रक् सहदोन्ही जण पसार झाले .

म्हणून याबाबत पोलीस ठाण्यात योगेश प्रकाश भोसले रा भोसले गल्ली पारोळा यांनी फिर्याद दिल्यावरून ट्रक चालक व क्लिनर यांच्याविरुद्ध 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील हे करीत आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या