Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! ऑनलाईन चॅलेंजने घेतला १३ वर्षीय बालकाचा जीव

धक्कादायक! ऑनलाईन चॅलेंजने घेतला १३ वर्षीय बालकाचा जीव

नागपूर | Nagpur

मोबाईलवर व्हिडिओ पाहून तशी कृती करण्याच्या नादात 13 वर्षीय बालकाचा गळफास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अग्रण्य बारापात्रे असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे…

- Advertisement -

सोमवारी गच्चीवरील शिडीला गळफास घेतलेल्या स्थितीत अग्रण्यचा मृतदेह आढळून आला होता. मोबाईलवरील एक चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात अग्रण्याच जीव गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दे दणादण! मुलाने चोरांनाच धू-धू धुतलं; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

अग्रण्य हा इयत्ता आठवीतील विद्यार्थी होता. लाठी-काठी चालवण्यात अग्रण्यने प्रावीण्य मिळवले होते. अग्रण्य हा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होता. सोशल मिडीयावरील पूर्ण करताना अग्रण्याचा जीव गेल्याचे म्हटले जात आहे. अग्रण्यने पाहिलेल्या व्हिडिओत एखादी कृती करायचे आव्हान स्वीकारायचे व ते पूर्ण करायचे प्रयत्न केले जातात. हेच चॅलेंज अग्रण्यने घेतले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या