Friday, April 26, 2024
Homeधुळेट्रकसह 13 लाखांची सुगंधित तंबाखु जप्त

ट्रकसह 13 लाखांची सुगंधित तंबाखु जप्त

धुळे । प्रतिनिधी Dhule

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई- आग्रा महामार्गावरील सोनगीर टोल नाक्यावर ट्रकसह 13 लाखांची सुगंधीत तंबाखुचा माल जप्त केला. कपडे व भाड्यांच्या आड त्याची वाहतूक केली जात होती. शिरपुरकडून धुळ्याकडे ट्रकमधून (क्र. एच.आर.55 ए.बी. 3207) अवैधरित्या महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधी तंबाखुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली.

- Advertisement -

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुशांत वळवी व पथकाने सोनगीर टोल नाक्याजवळ सापळा रचून ट्रकला पकडले. ट्रकला पोलीस अधीक्षक कार्यालय आणून तपासणी केली असता त्यात कपडे व भाडयांचा आडोश्याला लपवून ठेवलेले बॉक्समध्ये सुगंधित रत्ना छाप तंबाखु नं.3000 असे लिहिलेले 50 बॉक्स मिळून आले. एका बॉक्समध्ये 80 पुडे असा एकूण 3 लाख 26 हजार रुपये किंमतीची तंबाखु व दहा लाखांचा ट्रक असा एकूण 13 लाख 26 हजार रूपयांचा मुद्येमाल मिळून आला. तो पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या पथकातील पोसई सुशांत वळवी, पोहेकॉ रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, राहुल सानप, सागर शिर्के,विलास पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या