Wednesday, April 24, 2024
Homeजळगावचोपड्यात 12 पिस्तुलांसह पाच जिवंत काडतुसे जप्त

चोपड्यात 12 पिस्तुलांसह पाच जिवंत काडतुसे जप्त

चोपडा । Chopada

येथील बसस्थानकात हरियाणातील दोन तरुणांकडून (two youths from Haryana) 12 गावठी (12 pistols) बनावटीचे पिस्तूल व 5 जिंवत काडतुसे (five live cartridges) जप्त करण्यात आले असून.या दोघांना अटक (arrested) करण्यात आली असता न्यायलयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

सोमवारी रात्री दोघा संशयितांची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्यांचेकडून 12 गावठी बनावटीचे पिस्तूल,5 जिंवत काडतुसे व तीन मोबाईल असा दोन लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या पाच दिवसापूर्वी सातारा येथील पाच जणांकडून 6 गावठी बनावटीचे पिस्तूल ,30 जिवंत काडतूसे,4 मोबाईल फोन व फोर्ड कंपनीची एंडेवेअर मॉडेलचे चारचाकी वाहन असा चाळीस लाखाचा मुद्देमाल जप्तची कारवाई पोलिसांनी केली होती.विशेष म्हणजे नाशिक विभागातील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी त्यांच्या पथकाला तात्काळ घटनास्थळावर पाठवून सापळा रचला. यावेळी अमितकुमार धनपत धानिया (वय-30),शनेशकुमार रामचंदर तक्षक (वय-32) दोन्ही राहणार भागवी ता.चरखी दादरी जि.भिवानी (हरियाणा) हे तरुण बसस्थानक परिसरात संशयितपणे फिरतांना आढळून आल्याने पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

गेल्या या प्रकरणी पो.ना.किरण गाडीलोहर त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला गुरनं.348/2022 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व 7/25 अन्वये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून,दोघांना अटक करण्यात आली.दरम्यान मंगळवारी दुपारी दोघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि.अजित साळवे,संतोष चव्हाण,पो.उ.नि.घनश्याम तांबे,पो.हे.कॉ.जितेंद्र सोनवणे,दीपक वसावे,विलेश सोनवणे,प्रदीप राजपूत,सुनीलपाटील,संतोष पारधी,किरण गाडीलोहार,ज्ञानेश्वर जवागे,संदीप भोई,वेलचंद पवार,प्रमोद पवार,प्रकाश मथुरे,विजय बच्छाव,रवी पाटील,हेमंत कोळी यांच्या पथकाने केली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या