Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या'नांदूरमध्यमेश्वर'मधून ११ टीएमसी पाणी 'जायकवाडी'ला

‘नांदूरमध्यमेश्वर’मधून ११ टीएमसी पाणी ‘जायकवाडी’ला

नाशिक । प्रतिनिधी

मागील एक आठवड्यापासून वरुणराजा जिल्ह्यावर मेहरबान झाला आहे. चांद्यापासून अगदी बांद्यापर्यंत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडिकडे विसर्ग सुरु आहे. मागील अडीच महिन्यात नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडिला ११ टीएमसी पाणी पोहचले आहे…

- Advertisement -

मराठवाडयाची तहान भागविणारे जायकवाडी धरण यंदा ६५ टक्क्यांहून अधिक भरले अाहे. अौरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणि व उस्मानाबाद या आठ जिल्हयांना शेती व पिण्यासाठी पाणी जायकवाडीवर अवलंबून आहे. १०५ टीएमसी ऐवढ्या अफाट क्षमतेचे हे धरण असून गतवर्षी ते शंभर टक्के भरले होते.

यंदा देखील थोडे उशीराने का होईना जायकवाडिची भरण्याकडे वाटचाल सुरु आहे. गोदावरी खोर्‍यातून मराठवाडयाकडे पाण्याची आवक वाढत आहे. दारणा धरण भरले असून त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.

गंगापूर धरणही ८८ टक्के भरले अाहे. त्र्यंबकेश्वर व गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या अंबोली घाट परिसरात पावसाचा जोर आहे. ते बघता गंगापूर धरण ९० टक्के भरल्यानंतर त्यातून कधीही विसर्ग केला जाऊ शकतो.

नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून सातत्याने विसर्ग सुरु असून मागील अडीच महिन्यात ११ टीएमसी पाणी जायकवाडीला पोहचले असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. सद्यस्थितीत जायकवाडी धरण ६५ टक्यांहून अधिक भरले आहे. मराठवाड्यात यंदा वरुणराजाने कृपा केली आहे.

त्यामुळे जायकवाडीची पूर्ण क्षमतेने भरण्याकडे वाटचाल सुरु आहे. नियमानूसार जायकवाडी धरण ६५ टक्के भरल्यास गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडणे बंधनकारक नाही. त्यामुळे यंदा पाण्यावरुन नाशिक विरुध्द मराठवाडा हा वाद पेटणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या