Wednesday, April 24, 2024
Homeनगर11 मोटारसायकल श्रीरामपूर पोलिसांनी केल्या हस्तगत

11 मोटारसायकल श्रीरामपूर पोलिसांनी केल्या हस्तगत

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

15 डिसेंबर 2020 ते 7 जानेवारी 2021 या दरम्यान श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील

- Advertisement -

तसेच अन्य दाखल गुन्ह्यातील व बेवारस सापडलेल्या एकुण 11 मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक, संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रौरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी आयपीएस पोलीस अधिकारी आयुष नोपानी, पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस नाईक राशिनकर, पोलीस नाईक रविंद कोरडे, पोलीस नाईक दत्ता दिघे, पोलीस नाईक गणेश भिंगारदे, पोलीस नाईक ढोकणे, पोलीस नाईक वांढेकर तसेच तपास पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल दिघे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार यांनी केली आहे.

पोलिसांनी हस्तगत केलेल्या मोटारसायकलींमध्ये एमएच 17 बीबी 2226, करिज्मा मोटारसायकल, एमएच 17 यु 2022 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस, एमएच 20 डीबी 4391 काळ्या रंगाची शाईन, एमएच 17 सीजे 8636, टीव्हीएस स्टार, एमएच 17 एएस 6849 टीव्हीएस, राहुरी पोलीस स्टेशन एमएच 17 एडब्ल्यु 5474, बजाज प्लॅटीना, एमएच17 एके 3352 बजाज डिस्कव्हर, एमएच 16 बीएल 1970 काळ्या रंगाची शाईन, एमएच 17 एयु 4925 पॅशन प्रो., शिर्डी पोलीस स्टेशनमधील विना नंबरची थ्री डिलक्स, नाशिक जिल्हा सिन्नर विना नंबरची बुलेट अशा 11 दुचाकींचा समावेश आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्ह्यातील, चोरीस गेलेल्या मोटारसायकलचे गुन्ह्यात सखोल व बारकाईने तपास केला असता आशिष सुनिल बेलेकर (वय 28), हल्ली रा. शिरसगांव, ता. श्रीरामपूर मुळ रा. नारायणगांव ता. जुन्नर जि. पुणे याच्याकडे करिज्मा मोटारसायकल क्रमांक एमएच 97 बीबी 2226, हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस क्रमांक एमएच 197 यु 2022, काळ्या रंगाची शाईन मोटारसायकल क्रमांक एमएच 20 डीब्री 4399 अशा गाड्या मिळुन आल्या आहेत, तसेच किरण सुखदेव वाघ रा. कारेगांव याचेकडुन टीव्हीएस स्टार सीटी क्रमांक एमएच 97 सी जे 8636 असे वाहन मिळून आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या