Friday, April 26, 2024
Homeनाशिकसीईटीच्या धर्तीवर शंभर गुणांची दहावी, बारावीची परिक्षा घ्यावी

सीईटीच्या धर्तीवर शंभर गुणांची दहावी, बारावीची परिक्षा घ्यावी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

बोर्डाची दहावी व बारावीची परिक्षा रद्द न करता ती सीईटीच्या धर्तीवर शंभर गुणांची मल्टिपल चाॅईस प्रश्नोत्तर पध्दतिने परिक्षा घ्यावी अशी मागणी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष यशवंत बोरसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, करोना संकटामुळे इयत्ता नववी व अकरावीच्य‍ा परिक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात लाॅकडाऊन जारी करण्यात आला असून बोर्डाची दहावी व बारावीची परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी घेतला आहे.

मात्र राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करू नये. जर सर्व विषयाची परीक्षा घेणे अवघड असेल तर सीईटीच्या धर्तीवर शंभर गुणांची मल्टिपल चॉइस प्रश्न या पद्धतीने परिक्षा घेतली जावी.

त्यामध्ये विज्ञान, गणित, इंग्रजी, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र आणी मराठी किंवा हिंदी प्रत्येकी २० गुणांची एकाच दिवशी परीक्षा घ्यावी.

जेणेकरुन सर्व गैरसोय टळू शकेल. त्याच प्रमाणे बारावीच्या परीक्षा रद्द करू नयेत. रसायन शास्त्र, भौतिकशास्त्र, जीवाशास्त्र, गणित आणि इंग्लिश या पाच विषयांची प्रत्येकी वीस मार्कांची एकुण शंभर गुणांची परीक्षा एकाच दिवशी घेतली जावी.

जेणेकरुन पुढील प्रवेश प्रक्रिया सोपी जाईल आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे पण मूल्यमापन होईल, असा पर्याय राज्यशासनाला पत्राद्वारे सुचविण्यात आला आहे.

दहावी व बारावी बोर्डाची परिक्षा रद्द न करता सीईटीच्या धर्तीवर पेपर घ्यावेत.जेणेकरुन पेपर तपासणे व निकाल देणे ही दोन्ही प्रक्रिता सोपी होईल. त्यानंतर पुढिल शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित राबविता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पर्यायाने शिक्षण व्यवस्थेचे महत्व अबाधित राहिल.

यशवंत बोरसे,माजी कार्याध्यक्ष प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र

- Advertisment -

ताज्या बातम्या